कोलंबियाची पॉप स्टार शकीरा (Shakira) ही सध्या ग्लोबल स्टार (Global Star) आहे. शकीरा सध्या चर्चेत आली आहे ते म्हणजे तिच्या गाण्यामुळे नाही तर एका फसवणूक प्रकरणामुळे. शकीराच्या सध्या अडचणीमध्ये आहे. टॅक्स म्हणजेच कर फसवणूक प्रकरणी शकीराला सोमवारी बार्सिलोना कोर्टात हजर राहण्यासाठी समन्स बजावण्यात आले आहे.
मियामीमध्ये राहणारी 46 वर्षीय कोलंबियन स्टार शकीरा दोषी आढळल्यास तिला आठ वर्षांचा तुरुंगवास आणि 24 दशलक्ष युरो ($24 दशलक्ष) दंड भरावा लागू शकतो, असे द गार्डियनने वृत्त दिले आहे. या प्रकरणामध्ये शकीरा आतापर्यंत स्वत:ला निर्दोष असल्याचे सांगत आली आहे. पण आता थेट कोर्टानेच समन्स बजावल्यामुळे तिच्या अडचणीत वाढ झाली आहे. आता शकीराला स्पेन सरकारला कोट्यवधीची रक्कम भरावी लागणार आहे. हे पैसे देण्यासाठी ती आतापर्यंत टाळत होती.
हे संपूर्ण प्रकरण असे आहे की, 2012 ते 2014 पर्यंत शकीराने स्पॅनिश रहिवासी म्हणून सहा महिन्यांहून अधिक काळ घालवला. या काळामध्ये तिने कर भरणे अपेक्षित होते. पण तिने कर भरला नाही. पण तिने कर भरल्याचा दावा केला आहे. अशा परिस्थितीत, ती स्पेनची रहिवासी असल्याचे सिद्ध करण्यासाठी, फिर्यादीने 117 साक्षीदारांना बोलावले आहे. ज्यात केशभूषाकार, स्टुडिओ तंत्रज्ञ, नृत्य शिक्षक, डॉक्टर, ब्युटीशियन, स्त्रीरोगतज्ज्ञ आणि तिचा ड्रायव्हर यांचा समावेश आहे. शकीराचे हे कर फसवणूक प्रकरणी २०१८पासून चर्चेत आहे.
अशा परिस्थितीत शकीरा त्यावेळी कुठे राहत होती हे अद्याप निश्चित झालेले नाही. कोलंबियन पॉप स्टारने कर फसवणूक केल्याचा आरोप सरकारी वकिलांनी केला आहे. दरम्यान, शकीराचे अधिकृत निवासस्थान अजूनही बहामासमध्ये आहे. बहामासमधील कराचे दर स्पेनच्या तुलनेत खूपच कमी आहेत.
शकीराने कर अधिकाऱ्यांवर तिची प्रतिमा खराब करत असल्याचा आरोप केला आहे. शकीराने गेल्या वर्षी एका मुलाखतीत सांगितले होते की, हे सर्व खोटे आरोप आहेत. रिपोर्टनुसार, बार्सिलोना कोर्टात सुरू झालेला हा खटला 14 डिसेंबरपर्यंत चालणार आहे. ज्यामध्ये कोर्ट सुमारे 120 साक्षीदारांची सुनावणी घेणार आहे.
दरम्यान, शकीरा आणि तिची कायदेशीर टीम आतापर्यंत या आरोपांना खोटे असल्याचे सांगत होती. पण सोमवारी शकीराने दंड भरण्याचे मान्य केले. करारानुसार, शकीराला ३ वर्षांचा तुरुंगवास आणि अंदाजे 63 कोटी 73 लाख 15 हजार रुपये (7 दशलक्ष युरो) दंड ठोठावण्यात आला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.