इंडियन मुजाहिद्दीनचा दहशतवादी सईद मकबूल याला १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. एनआयएच्या विशेष न्यायालयाने गुरुवारी ही शिक्षा सुनावली आहे. सईद मकबूल याच्यावर २०१२ मध्ये दहशतवादी कट रचल्याचा आरोप आहे. २२ सप्टेंबर २०२३ रोजी दिल्लीच्या विशेष न्यायालयाने त्याला दोषी ठरवलं होतं. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
याच आरोपाखाली सईद मकबूल याला १० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. दरम्यान, प्रकरणातील एकूण ११ आरोपींपैकी मकबूल हा दोषी ठरलेला पाचवा व्यक्ती आहे. यापूर्वी १२ जुलै रोजी कोर्टाने दानिश अन्सारी, आफताब आलम, इम्रान खान आणि ओबेद-उर-रहमान या ४ जणांना दोषी ठरवलं होतं.
या चारही आरोपींना १० वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली होती. यासंदर्भात माहिती देताना एनआयएच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, २८ फेब्रुवारी २०१३ रोजी महाराष्ट्रातील नांदेड भागात राहणाऱ्या मकबूलला इंडियन मुजाहिद्दीनच्या सदस्यांमध्ये सक्रिय सहभाग आणि गुन्हेगारी आणि कटात सहभागाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती.
त्यानंतर त्याची कसून चौकशी करण्यात आली. मकबूलने पाकिस्तानस्थित रियाझ भटकळ आणि भारतस्थित इम्रान खान आणि इंडियन मुजाहिदीनचे प्रमुख सदस्य ओबेद-उर-रहमान यांच्याशी घनिष्ठ संबंध ठेवल्याचे चौकशीअंती उघड झाले. ज्यामध्ये पाकिस्तानमध्ये राहणारा रियाझ भटकळ आणि भारतात राहणारा इम्रान खान आणि ओबेद-उर-रहमान याचा समावेश होता.
मकबूलने भारतातील विविध ठिकाणी हल्ले करण्याचा कट रचला, ज्याचे प्राथमिक लक्ष्य हैदराबाद होते. आरोपींनी हैदराबादसह अनेक महत्त्वाच्या ठिकाणांची रेकी केली होती. दरम्यान, ज्या दहशतवादी कारवायांशी हे प्रकरण संबंधित होते त्यात वाराणसीतील ७ मार्च २००६ चे बॉम्बस्फोट, ११ जुलै २००६ चे मुंबई साखळी बॉम्बस्फोट, २३ नोव्हेंबर २००७ रोजी उत्तर प्रदेशातील न्यायालयांमध्ये झालेले साखळी बॉम्बस्फोट यांचा समावेश होता.
मार्चमध्ये या प्रकरणात आरोपी यासीन भटकळ, असदुल्ला अख्तर, झिया-उर-रहमान, तहसीन अख्तर आणि हैदर अली यांच्यावर औपचारिक आरोप ठेवण्यात आले होते. यातील सईद मकबूल याला १० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली असून इतर आरोपींवरील खटला सुरू आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.