Priyanka Gandhi: PM नरेंद्र मोदींवर टीका करणं भोवलं, केंद्रीय निवडणूक आयोगाकडून प्रियंका गांधींना नोटीस

Priyanka Gandhi News: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करणं काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्या प्रियंका गांधी यांना भोवलं आहे.
Priyanka Gandhi News
Priyanka Gandhi NewsSaam tv
Published On

Priyanka Gandhi News:

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करणं काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्या प्रियंका गांधी यांना भोवलं आहे. या टीकेनंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने प्रियंका गांधी यांना आचारसंहितेचं उल्लंघन केल्याप्रकरणी कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे. (Latest Marathi News)

प्रियंका गांधी यांनी राजस्थानमधील दौसा इथं एका सभेला संबोधित करताना मोदी यांच्यावर टीका केली होती. निवडणूक आयोगाने प्रियंका यांना नोटीस पाठवून ३० ऑक्टोबरपर्यंत संध्याकाळी ५ वाजेपर्यंत या नोटीसला उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत.

Priyanka Gandhi News
Jammu Kashmir News: जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा दलाला मोठं यश; ५ दहशतवाद्यांचा केला खात्मा

काय आहे प्रकरण?

भाजपने तक्रारीत म्हटलं की, प्रियंका गांधी यांनी २० ऑक्टोबर रोजी औसा येथील सभेला संबोधित करताना म्हटलं की, 'नरेंद्र मोदी यांनी एका मंदिराला दान केलेल्या लिफाफ्यात फक्त २१ रुपये होते. प्रियंका गांधी यांनी म्हटलं की, त्यांनी हे वृत्त टीव्हीत पाहिलं आहे. पुढे त्यांनी म्हटलं की, टीव्हीचा दावा खरा आहे हे माहीत नाही. भाजप लोकांना लिफाफा दाखवते, पण त्यात काही नसतं'. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

भाजपची निवडणूक आयोगात तक्रार

प्रियंका गांधी यांच्या टिप्पणीनंतर केंद्रीय मंत्री अर्जुनसिंह मेघवाल यांनी केंद्रीय निवडणूक आयोगात धाव घेतली. त्यानंतर केंद्रीय मंत्री अर्जुनसिंह मेघवाल यांनी प्रियंका गांधी यांच्या विरोधात कारवाईची मागणी केली. या मागणी पत्रात त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्या वैयक्तिक धार्मिक भावनांबाबत खोटे दावे करत भावना दुखावण्याचं काम केल्याचं आरोप केला.

Priyanka Gandhi News
Maratha Reservation: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजप आमदार नाराज; पक्षालाच दिला मोठा इशारा

तत्पूर्वी, केंद्रीय निवडणूक आयोगाने प्रियंका गांधी यांना आचारसंहितेतील तरतूदीची आठवण करून दिली. 'पक्ष आणि उमेदवारांनी खासगी जीवनातील पैलूंवर टीका करणं टाळावं, असं या नोटीसमध्ये म्हटलं आहे.

Priyanka Gandhi News
Qutar News: मोठी बातमी! भारतीय नौदलाच्या ८ माजी अधिकाऱ्यांना कतारमध्ये सुनावली फाशीची शिक्षा; प्रकरण काय?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com