Qutar News: मोठी बातमी! भारतीय नौदलाच्या ८ माजी अधिकाऱ्यांना कतारमध्ये सुनावली फाशीची शिक्षा; प्रकरण काय?

Death Sentence To Eight Former Indian Navy Officers: या माजी नौदल अधिकाऱ्यांवर इस्रायलसाठी हेरगिरी केल्याचा आरोप करण्यात आला होता.
Eight Indians Sentenced to Death in Qatar:
Eight Indians Sentenced to Death in Qatar: Saamtv
Published On

Eight Indians Sentenced to Death in Qatar:

कतारमध्ये भारतीय नौदलाच्या ८ माजी कर्मचाऱ्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. या माजी नौदल अधिकाऱ्यांवर इस्रायलसाठी हेरगिरी केल्याचा आरोप करण्यात आला होता. या निर्णयाविरोधात भारतीय विदेश मंत्रालयाने प्रेस नोट प्रसारित केली असून फाशीच्या निर्णयाच्या शिक्षेने आम्ही हैरान झालो आहोत, असे यामध्ये म्हणले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, कतारमध्ये (Qutar) भारतीय नौदलाच्या आठ माजी कर्मचाऱ्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. आठ महिन्यांपूर्वी या सर्वांना अटक करण्यात आली होती. हेरगिरी प्रकरणात दोषी ठरल्याने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

या निर्णयावर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने नाराजी व्यक्त करत आम्हाला फाशीच्या शिक्षेच्या निर्णयामुळे मोठा धक्का बसला आहे आणि सविस्तर निर्णयाची वाट पाहत असल्याचे सांगितले आहे.

Eight Indians Sentenced to Death in Qatar:
PM Modi: शरद पवारांनी शेतकऱ्यांसाठी काय केलं?; अजित पवारांसमोरचं पंतप्रधान मोदींचा टोला

हे सर्व नौदल अधिकारी दाहरा ग्लोबल टेक्नॉलॉजी आणि कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या खासगी कंपनीसाठी काम करत होते. ही कंपनी कतार सरकारच्या नौदलाला प्रशिक्षण द्यायची. या माजी नौदल अधिकाऱ्यांवर इस्रायलसाठी हेरगिरी केल्याचा कतारने आरोप केला आहे. दरम्यान, या निर्णयाविरोधात भारत सरकार आपली भूमिका मांडणार असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.

"आम्ही कुटुंबातील सदस्य आणि कायदेशीर टीमच्या संपर्कात आहोत. प्रत्येकजण कायदेशीर पर्याय शोधत आहे. आम्ही या प्रकरणावर बारकाईने लक्ष ठेवून आहोत. आम्ही सर्व कॉन्सुलर आणि कायदेशीर बाबींची तपासणी करणार असून आम्ही हा निर्णय कतारी अधिकाऱ्यांकडेही मांडू, असे परराष्ट्र मंत्रायलाने सांगितले आहे. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com