PM Modi: शरद पवारांनी शेतकऱ्यांसाठी काय केलं?; अजित पवारांसमोरचं पंतप्रधान मोदींचा टोला

Prime Minister Modi: पंतप्रधान मोदींनी काकडी गावातील शेतकरी मेळाव्यात बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली.
Prime Minister Modi
Prime Minister ModiANI Saam
Published On

Prime Minister Modi:

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शिर्डीच्या दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान मोदींनी निळवंडे धरणाच्या लोकार्पण केलं. लोकार्पण केल्यानंतर पंतप्रधान मोदींनी काकडी गावातील शेतकरी मेळाव्याला उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँगेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर नाव न घेता टीका केली. महाराष्ट्राचे वरिष्ठ नेते आणि कृषीमंत्री राहिलेल्या एका नेत्याने शेतकऱ्यांसाठी काय केले? असा सवाल मोदीं यावेळी केला. (Latest News)

शेतकरी मेळाव्यात बोलताना पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणाला मराठीतून सुरुवात केली. छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन केलं. त्यानंतर बाबा महाराज सातारकर यांना शद्धांजली वाहिली. त्यानंतर शेतकरींसाठी मोदी सरकार आणि महाराष्ट्र सरकारने केलेल्या कामांची माहिती दिली. त्याचवेळी त्यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मंचावर उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार मंचावर उपस्थित होते. त्यांच्यासमोरच पंतप्रधान मोदींनी शरद पवारांवर टीका केली. आपले सरकार येण्याआधी महाराष्ट्रातील एक मोठे नेते अनेक वर्ष केंद्र सरकारमध्ये कृषी मंत्री कृषी मंत्री म्हणून काम करत होते. मी त्यांचा व्यक्तिगतरीत्या सन्मान करतो मात्र ७ वर्षांच्या आपल्या कार्यकाळात त्यांनी देशभरातल्या शेतकऱ्यांकडून साडेतीन लाख कोटी एमएसपीवर धान्य खरेदी केले. परंतु आपल्या सरकारने सात वर्षात साडेतीन १३ लाख कोटी रुपये एमएसपीच्या माध्यामातून शेतकऱ्यांना दिलेत.

२०१४ च्या आधी महाराष्ट्रातील एक नेते अनेकवेळा राज्याचे कृषी मंत्री राहिले. परंतु त्याच्या काळात शेतकऱ्यांसाठी काहीच काम झाले नाही. त्यांनी फक्त राजकराणासाठी शेतकऱ्यांचे नाव वापरले. त्यांच्या काळात शेतकऱ्यांचे मोठे हाल होते. २०१४ आधी डाळींची खरेदी ५०० ते ६०० कोटी रुपयांची खरेदी ही एमसपीवर होत होती. परंतु आमच्या सरकारने १ लाख १५ हजार कोटी पेक्षा जास्त रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे टाकले.

जेव्हा ते कृषीमंत्री होते तेव्हा शेतकऱ्यांना आपल्या पैशासाठी मध्यस्थी म्हणजे अडतांवर अवलंबून राहवे लागत होते. शेतकऱ्यांना त्यांच्या पैशासाठी एक महिन्यापेक्षा जास्त दिवस वाट पाहावी लागत होती. परंत आमच्या सरकारने एमएसपीचा पैसा डायरेक्ट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पाठवण्याचा निर्णय घेतला.

मेळाव्यात पंतप्रधान मोदींनी एमएसपीविषयीची माहिती दिली. रब्बीच्या पिकांसाठी एमएसपी वाढवण्यात आली. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना फायदा होईल असं मोदी म्हणाले. हरभरा पिकाच्या एमएसपीमध्ये १०५ रुपये तसेच गहूच्या पिकासाठी १५० रुपयांची वाढ करण्यात आलीय. यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मोठा आर्थिक लाभ होईल. ऊस शेतकरी करणाऱ्या शेतकऱ्यांचा देखील विचार आमचे सरकार करत आहे.

ऊसाची एफआरपी ही ३१५रुपये प्रति क्किंटल करण्यात आले आहे. मागील ९ वर्षात ७० हजार कोटी रुपयांचे इथेनॉल घेण्यात आले असून हे पैसेही थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना वेळेच पैसे मिळावेत, यासाठी साखर कारखाने आणि सहकारी समितींना हजारो कोटी रुपयांची मदत देण्यात आलीय. देशातील शेतकऱ्यांना शेतमाल साठवता यावा यासाठी गोदामे मिळावीत यासाठी सहकारी समितींनी मदत दिली जात आहे. तर छोट्या शेतकऱ्यांना एफओ म्हणजे शेतकरी उत्पादक संघटनेच्या माध्यमातून एकत्र केलं जात आहे.

Prime Minister Modi
Eknath Shinde News: विकास पाहून काहींना पोटदुखी होते; मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com