Yashasvi Jaiswal Catch x
Sports

Yashasvi Jaiswal : राशिदचा नो लूक शॉट, यशस्वी जयस्वालने हवेतच पकडला जबरदस्त कॅच; Video व्हायरल

Yashasvi Jaiswal Catch : गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स ही लढत सुरु आहे. या सामन्यात यशस्वी जयस्वालने उकृष्ट कॅच पकडून राशिद खानला बाद केले. त्याच्या शानदार कॅचची चर्चा सोशल मीडियावर होत आहे.

Yash Shirke

GT VS RR Video : आयपीएल २०२५ मधील २३ वा सामना आज नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगला आहे. घरच्या स्टेडियमवर पहिल्यांदा फलंदाजी करताना गुजरात टायटन्सने एकूण २१७ धावा केल्या. या सामन्यादरम्यान सलामीसाठी आलेल्या यशस्वी जयस्वाल फक्त ६ धावा करुन माघारी परतला. पण यशस्वी जयस्वालने पकडलेल्या कॅचची चर्चा होत आहे.

नेमकं काय घडलं?

सलामीपासून टिकून राहिलेला साई सुदर्शन ओव्हरमध्ये बाद झाल्यानंतर राशिद खान फलंदाजीसाठी आला. तुषार देशपांडेच्या तेव्हा गोलंदाजी करत होता. तेव्हा राशिदने पहिल्या बॉलवर सिक्स आणि दुसऱ्या बॉलवर फोर मारला. ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर राशिदने नो लुक शॉट मारला. बॉल बॅकवर्ड स्क्वायर लेगच्या दिशेने गेला. तेथे यशस्वी जयस्वालने डाइव्ह मारत उकृष्ट कॅच पकडला. कॅच पकडल्यानंतर राशिद खानची रिॲक्शन पाहण्यासारखी होती.

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स ही लढत सुरु आहे. या सामन्यामध्ये राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनने टॉस जिंकत पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना गुजरातने २० ओव्हर्समध्ये २१७ धावा केल्या. गुजरातकडून खेळताना साई सुदर्शनने सर्वात जास्त ८२ धावा केल्या.

गुजरात टायटन्सची प्लेईंग 11 -

साई सुदर्शन, शुबमन गिल (कर्णधार), जोस बटलर, शेरफेन रुदरफोर्ड, राहुल तेवतिया, राशिद खान, अरशद खान, साई किशोर, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा

राजस्थान रॉयल्सची प्लेईंग 11 -

यशस्वी जयस्वाल, संजू सॅमसन (कर्णधार), नितीश राणा, रियान पराग, शिमरॉन हेटमायर, ध्रुव जुरेल, जोफ्रा आर्चर, महेश तीक्षणा, फजलहक फारूकी, संदीप शर्मा, तुषार देशपांडे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Police Death: पोलीस दलात आत्महत्येचं सत्र काही थांबेना! ४ दिवसात ३ आत्महत्या, काय आहे कारण?

Mahalaxmi Vrat 2025 : महालक्ष्मी व्रताची तारीख, पूजा विधी, महत्व घ्या जाणून

Maharashtra Live News Update: ते वक्तव्य करून अजित पवारांकडून मला टॉर्चर करण्याचा प्रयत्न; राम शिंदेंचा आरोप

Gunfire Shooting : क्लबमध्ये अंदाधुंद गोळीबार! तिघांचा जागीच मृत्यू, आठजण जखमी

Astro Tips: सकाळी उठल्यावर आरशात पाहणे शुभ असते की अशुभ?

SCROLL FOR NEXT