gt vs pbks Shashank Singh mistakenly picked by Punjab kings now he scored man winning half century against Gujarat Titans  twitter
क्रीडा

Shashank Singh: लिलावात चुकून घेतलेला खेळाडू ठरला पंजाबच्या विजयाचा शिल्पकार

GT vs PBKS, IPL 2024: आयपीएल २०२४ स्पर्धेतील १७ व्या सामन्यात गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्ज हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडलेल्या या सामन्यात पंजाबला विजयासाठी २०० धावांची गरज होती

Ankush Dhavre

Shashank Singh,GT vs PBKS:

आयपीएल २०२४ स्पर्धेतील १७ व्या सामन्यात गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्ज हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडलेल्या या सामन्यात पंजाबला विजयासाठी २०० धावांची गरज होती. या धावांचा पाठलाग करताना पंजाब किंग्ज संघाकडून पुन्हा एकदा शशांक सिंग चमकला आहे. एकवेळेस गुजरात टायटन्स संघ हा सामना एकतर्फी जिंकणार असं चित्र दिसत असताना शशांक सिंगने विजय खेचून आणला आणि संघाला विजय मिळवून दिला.

शशांक सिंग हा तोच फलंदाज आहे, ज्याला पंजाब किंग्जने चुकून आपल्या संघात स्थान दिलं होतं. लिलाव सुरू असताना शशांकचं नाव येताच पंजाब किंग्जच्या मालकांनी बोली तर लावली आणि १..२.३. करत आपल्या ताफ्यात घेतलं. मात्र त्यानंतर त्यांना जाणवलं की, हा तो शशांक जो आपल्याला हवा आहे. त्यानंतर पंजाब किंग्जच्या मालकांनी ही बोली मागे घेण्याची विनंती केली. मात्र असं होऊ शकलं नाही आणि शशांक सिंग पंजाब किंग्ज संघात दाखल झाला.

जे काही होतं ते चांगल्यासाठीच होतं असं म्हणतात. आता शशांक सिंगच्या बाबतीत हे खरं ठरलं आहे. गेल्या सामन्यात रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरू आणि गुजरात टायटन्स संघाविरुद्ध महत्वपूर्ण खेळी करून त्याने संघाला विजय मिळवून दिला आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात त्याने ८ चेंडूत २१ धावांची खेळी केली होती. आता संघ अडचणीत असताना त्याने ताबडतोड खेळी करत २९ चेंडूत ६४ धावा चोपल्या. आपल्या या खेळीदरम्यान त्याने ६ चौकार आणि ४ षटकार मारले. (Cricket news in marathi)

या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, प्रथम फलंदाजी करत असलेल्या गुजरात टायटन्स संघाने २० षटक अखेर १९९ धावा केल्या. पंजाबला हा सामना जिंकण्यासाठी २०० धावांची गरज होती. या धावांचा पाठलाग करताना पंजाबकडून शशांकने सर्वाधिक ६१ धावा करत संघाला विजय मिळवून दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yugendra Pawar News : बारामतीत युगेंद्र पवारांची सांगता सभा, प्रचाराच्या तोफा थंडावल्या

Vinesh Phogat: आम्ही तेव्हाच सेफ राहू जेव्हा तुमचे नेते महिला अत्याचार थांबवतील, विनेश फोगाट यांचा भाजपवर निशाणा

Washim Vidhan Sabha : वाशिम विधानसभा मतदारसंघात बंडखोर उमेदवाराचा भाजपात प्रवेश; महायुतीला होणार फायदा

Ajit Pawar Speech : अजित पवारांनी जाहीर कबुल केलं; बारामतीकरांसमोर चूक मान्य करत म्हणाले...VIDEO

Maharashtra Assembly Election 2024: सावधान! मतदानासंदर्भात दिशाभूल करणारे संदेश पाठवाल तर होईल कडक कारवाई

SCROLL FOR NEXT