GT Vs PBKS IPl 2024: शशांक सिंग ठरला विजयाचा 'किंग'; ३ विकेट राखत पंजाबचा दणदणीत विजय

GT Vs PBKS : आयपीएल २०२४ स्पर्धेतील १७ वा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झाला. या सामन्यात पंजाबच्या शशांकने कमाल केली.
GT Vs PBKS
GT Vs PBKSx IPl

Gujarat Titans vs Punjab Kings Match Punjab won By 3 wickets :

पंजाब किंग्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी घेत गुजरात टायटन्सला फलंदाजी आमंत्रण दिलं. गुजरातच्या संघाने २० षटकाअखेर १९९ धावा केल्या. गुजरातने दिलेलं आव्हान पंजाबचा सिंह ठरलेल्या शशांक सिंगने सहजगत्या पार केलं. शशांकच्या ६१ धावांच्या खेळीपुढे शुभमन गिलची नाबाद ८९ धावांची खेळी फेल ठरली. या विजयासह पंजाब किंग्सने घरच्या मैदानावरील गुजरातचे वर्चस्व संपुष्टात आणलं. (Latest News)

गुजरातने दिलेल्या २०० धावांचं आव्हान पंजाब किंग्ससाठी आधी अशक्य वाटतं होतं. संघाने ७० धावांमध्येच सुरुवातीचे ४ फलंदाज तंबूत परतले होते. यात कर्णधार शिखरसह दिग्गज खेळाडू होते. परंतु संघातील इम्पॅक्ट खेळाडू आशुतोष शर्मा आणि शशांक सिंगने गुजरातचा धुव्वा उडवत पंजाबला ३ गडी राखत विजय मिळवून दिला. यंदाच्या मोसमातील हा सर्वात मोठा आणि यशस्वी पाठलाग असल्याचं म्हटलं जात आहे. शशांक सिंगने २१० च्या स्ट्राइक रेटने नाबाद राहत २९ चेंडूमध्ये ६१ धावा केल्या. यात ६ चौकार आणि ४ चौकारांचा समावेश आहे.

(साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पंजाबकडून प्रभसिमरन सिंगने शानदार ३५ धावा केल्या. शिखर धवन, जॉनी बेअरस्टो, सॅम कुरन आणि सिकंदर रझासारखे फलंदाज आज फ्लॉप ठरले. मात्र शशांक सिंगने आपल्या शानदार फलंदाजीने पंजाबला विजय मिळवून दिला. शशांकने अवघ्या २५ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. दुसऱ्या टोकाला विकेट पडत राहिल्या, पण शशांकने हार न मानता फटेकबाजी चालू ठेवली. आशुतोष शर्माने अवघ्या १६ चेंडूंत ३ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने ३१ धावांची तुफानी खेळी केली. त्याने १८०च्या स्ट्राइक रेटने या धावा केल्या.

नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या गुजरात टायटन्सची सुरुवात चांगली राहिली नाही. तिसऱ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर गुजरातची पहिली विकेट पडली. ऋद्धिमान साहाने १३ चेंडूत ११ धावा केल्या. कागिसो रबाडाच्या चेंडूवर शिखर धवनने त्याला झेलबाद केले. यानंतर शुभमन गिलने केन विल्यमसनसोबत डावाची धुरा सांभाळली. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ४० धावा जोडल्या. पंजाबच्या हरप्रीत ब्रारने ही भागीदारी तोडली. त्याने केन विल्यमसनला आपला बळी बनवला.

विल्यमसनने २२ चेंडूत २६ धावा केल्या. यानंतर गिलने साई सुदर्शनच्या साथीने तिसऱ्या विकेटसाठी ५३ धावांची भागीदारी केली. १४ व्या षटकात हर्षल पटेलने साई सुदर्शनला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. साईने १९ चेंडूंत ६ चौकारांच्या मदतीने ३३ धावा केल्या. गुजरात टायटन्सची चौथी विकेट १८ व्या षटकात पडली. विजय शंकरने १० चेंडूंचा सामना केला यात त्याला फक्त केवळ ८ धावा करता आल्या.

GT Vs PBKS
IPL 2024: मुंबई इंडियन्ससाठी आनंदाची बातमी; मिस्टर ३६० सूर्या झाला फिट; कधी दिसणार मैदानात?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com