RCB १६ वर्षात एकदाही IPL विजेता का नाही? ६ वेळा आयपीएल चॅम्पियन खेळाडू अंबाती रायडूनं सांगितलं कारण

Why RCB Loss In IPL : आयपीएल म्हटलं तर क्रिकेट चाहत्यांसमोर तीन संघांची नावे प्रामुख्याने येतात, ती नावे म्हणजे चेन्नई सुपर किंग्स, मु्ंबई इंडियन्स आणि तिसरा संघ म्हणजे रॉयल्स चॅलेंजर्स बेंगळुरु. मुंबई आणि चेन्नईच्या संघाने आयपीएलची ट्रॉफी पाचवेळा मिळवलीय. यामुळे हे दोन्ही संघ चाहत्यांच्या लक्षात राहतात. पण आरसीबी संघ चाहत्यांच्या लक्षात राहतो, विजयामुळे नाही तर त्याच्या पराभवामुळे.
Ambati Rayudu
Ambati Rayudusaam

Ambati Rayudu Told Why RCB Loss In Ipl :

बेंगळुरूमधील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या सामन्यात आरसीबीला २८ धावांनी पराभव स्वीकारावा लागलाय. यंदाच्या हंगामात आरसीबीच्या वाट्याला ४ सामन्यात तीन पराभव आलेत.दरम्यान, आयपीएल म्हटलं तर क्रिकेट चाहत्यांसमोर तीन संघांची नावे प्रामुख्याने येतात, ती नावे म्हणजे चेन्नई सुपर किंग्स, मु्ंबई इंडियन्स आणि तिसरा संघ म्हणजे रॉयल्स चॅलेंजर्स बेंगळुरु. (Latest News)

हे तिन्ही संघ वेगवेगळ्या गोष्टींमुळे आणि कारणांमुळे चाहत्यांच्या लक्षात राहतात. मुंबई आणि चेन्नईच्या संघाने आयपीएलची ट्रॉफी पाचवेळा मिळवलीय. यामुळे हे दोन्ही संघ चाहत्यांच्या लक्षात राहतात. पण आरसीबी संघ चाहत्यांच्या लक्षात राहतो, तो विजयामुळे नाही तर त्याच्या पराभवामुळे. आयपीएल जेव्हापासून सुरू झाले आहे, तेव्हापासून आरसीबीच्या संघाला एकदाही ही ट्रॉफी आपल्या नावे करता आली नाहीये.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आरसीबीचा संघ ट्रॉफी का जिंकू शकत नाही, असा प्रश्न अनेकांना पडत असेल परंतु त्याचे उत्तर अनेकांना मिळालं नसेल. आयपीएल २००८ पासून सुरू झाले आहे, तेव्हापासून ते आतापर्यंत आरसीबीच्या संघाला एकदाही ही ट्रॉफी जिंकता आली नाहीये. यामागे कारण काय आहे, याचं उत्तर सीएसकेचा आणि माजी भारतीय खेळाडू अंबाती रायडूने सांगितलंय. आरसीबी ट्रॉफी न जिंकण्यामागे विराट कोहली जबाबदार असल्याची टीका रायडूने केलीय.

आयपीएलमधील आपल्या प्रत्येक सामन्यात आरसीबीचा प्रत्येक खेळाडू जीव तोडून खेळत असतो. तरीही ते अनेक सामने गमावत असतात. गेल्या १६ हंगामात एकदाही आरसीबीला ट्रॉफी न जिंकता आली नाहीये. यामागे एक कारण आहे, ते म्हणजे विराट कोहली. लखनऊ सुपर जायंट्स विरुद्धच्या सामन्यात कोहलीला फिरकीपटूने बाद केल्यानंतर रायडूने ही टीका केलीय.

गेल्या काही वर्षांत आरसीबीची सर्वात मोठी समस्या म्हणजे खेळाडूंना संघाकडून मिळत नसलेला पाठिंबा. संघाने शेन वॉटसन, युझवेंद्र चहल, मिचेल स्टार्क आणि शिवम दुबे यांसारख्या मॅच-विनर्स खेळाडूंना फ्रेंचायझी सहज सोडून देते, असं रायडू म्हणाला.

विराट कोहली वर्षानुवर्षे आरसीबीचा कर्णधार होता. लिलाव प्रक्रियेत खेळाडूंना राखून ठेवण्याचा विचार कोहली करायचा परंतु संघाने कधीच दर्जेदार गोलंदाज विकत घेतले नाही. या समस्येमुळे त्यांना वर्षानुवर्षे पराभवाचा परिणाम भोगावा लागत आहे. फलंदाजीच्या क्रमवारीतही संघाचे नियोजन ढिसूळ आहे. वरच्या फळीतील फंलदाज बाद झाले, तर विजयापर्यंत नेणारा कोणताच फलंदाज खालच्या फळीत नाहीये.

आरसीबीच्या संघ व्यवस्थापनाने कधीच चांगले खेळाडू विकत घेतले नाहीत. तसेच संघाकडून कधीच चांगल्या खेळाडूंचे कौतुक झाले नाही किंवा त्यांच्या पाठीशी संघ उभा राहिला नाहीये. परिणामी अनेक खेळाडू संघ सोडून दुसऱ्या फ्रेंचायझी सोबत गेलेत. त्याच खेळाडूंनी दुसरीकडे चांगली कामगिरी केलीय. “ विराट कोहलीने फ्रँचायझीसाठी ७००० हून अधिक धावा केल्यात. पण तो सोडून आणखी एका फलंदाजाचे नाव सांगा जो आरसीबीसाठी सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत आहे. क्वचितच कोणी असेल. एका खेळाडूच्या खांद्यावर स्वार होऊन संघ ट्रॉफी जिंकू शकत नाही, असं अंबाती रायडू स्टार स्पोर्ट्सवर बोलताना म्हणालाय.

Ambati Rayudu
RCB vs LSG : मयंक यादव ठरला आरसीबीचा 'कर्दनकाळ'; घरच्या मैदानात बेंगळुरुचा २८ धावांनी पराभव

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com