इंडियन प्रीमियर लीग २०२४ मधील मुंबई इंडियन्सची कामगिरी आतापर्यंत काही विशेष राहिलेली नाही. तीन सामन्याच्या प्रवासात मुंबई संघाला तीनवेळा पराभव स्वीकारावा लागलाय. १७ व्या हंगामाला सुरुवात होण्यापूर्वी मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला गुजरात टायटन्समधून खरेदी केले होते. यानंतर रोहित शर्माच्या जागी त्याला एमआयचे कर्णधारपद देण्यात आले. एमआयच्या या निर्णयामुळे चाहते प्रचंड संतापलेत. (Latest News)
चाहते हार्दिक पांड्याला प्रत्येक सामन्यात ट्रोल करत आहेत. मात्र आता काही सोशल मीडिया युझर्स नेटीझन्स हार्दिकच्या बचावासाठी पुढे आले आहेत. सोशल मीडियावर आता #DontHateHardik ट्रेंड होत आहे. आयपीएल २०२४ मध्ये मुंबई इंडियन्सने आतापर्यंत ३ सामने खेळले आहेत आणि यात त्यांना पराभव मिळालाय. मुबंईच्या पहिल्या सामन्यात गुजरात टायटन्सने त्यांचा ६ धावांनी पराभव केला.
दुसऱ्या सामन्यात एमआयला सनरायझर्स हैदराबादकडून पराभव स्वीकारावा लागला. एसआरएचने एमआयला ३१ धावांनी मात दिली. या सामन्यात एसआरएचच्या फलंदाजांनी एमआयच्या गोलंदाजांची जोरदार धुलाई केली होती. त्यानंतर शेवटच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडियन्सचा ६ विकेट्सने पराभव केला.
IPL २०२४ मधील हार्दिक पांड्याच्या कामगिरी हवी तितकी चांगली राहिली नाहीये. गुजरात टायटन्सविरुद्धच्या पहिल्या सामन्यात त्याने ४ चेंडूत ११ धावा केल्या. याशिवाय त्याने ३ षटकात ३० धावा दिल्या होत्या. पण त्याला एकही विकेट मिळवता आली नाही. हैदराबादच्या संघाविरुद्ध पांड्याने ४ षटकात ४६ धावा दिल्या आणि २० चेंडूत २४ धावा केल्या. राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या गेल्या सामन्यात हार्दिकने गोलंदाजी केली नव्हती. पण फलंदाजीदेखील चांगली केली नाही. त्याने ६ चौकारांच्या मदतीने २१ चेंडूत ३४ धावा केल्या असल्या तरी संघाला तो विजय मिळून देऊ शकला नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.