GT VS DC Rahul Tewatia Jos Buttler X
Sports

Rahul Tewatia : सामना तर जिंकवला, पण तेवतियाने बटलरचा गेम केला, आता ट्रोलिंगचं केंद्रस्थान बनला

GT VS DC Rahul Tewatia : गुजरात टायटन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स या सामन्यात गुजरातचा विजय झाला आहे. या सामन्याचा विजयी शॉट राहुल तेवतियाने मारला. सामना जिंकवून देताना बटलरला स्ट्राईक न दिल्याने तेवतियाला ट्रोल केले जात आहे.

Yash Shirke

IPL 2025 : नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या गुजरात टायटन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स या सामन्यात गुजरातचा विजय झाला आहे. दिल्ली कॅपिटल्सने प्रथम फलंदाजी करताना २०३ धावा केल्या. गुजरातने शेवटचे चार बॉल शिल्लक असताना सामना जिंकला. जोस बटलरच्या विक्रमी नाबाद ९७ धावांमुळे गुजरातने दिल्लीला पछाडले. त्याच्या खेळीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

२०४ धावांचा पाठलाग करताना सलामीवीर साई सुदर्शन आणि शुभमन गिल सलामीला मैदानात उतरले. मात्र कॅप्टन गिल फक्त ७ धावा करून माघारी परतला. त्यानंतर फॉर्मात असलेल्या साई सुदर्शनने आकर्षक फटकेबाजी करत ३६ धावा केल्या. जोस बटलर आणि शेरफन रुदरफोर्ड मोर्चा सांभाळला. आक्रमक खेळताना त्यांनी चांगली भागीदारी केली. ४३ धावा करुन शेरफन रुदरफोर्ड तंबूत परतला.

रुदरफोर्डची विकेट पडल्यानंतर राहुल तेवतिया फलंदाजीसाठी आला. शेवटची ओव्हर स्टार्कची होती. तेव्हा पहिल्या बॉलवर तेवतियाने जोरदार षटकार मारला. लगेचच दुसऱ्या बॉलवर चौकार मारत गुजरात टायटन्सला विजय मिळवून दिला. मिचेल स्टार्कसारख्या गोलंदाजांच्या ओव्हरमध्ये १ षटकार, १ चौकार मारत १० धावा करण्यावरुन राहुल तेवतियाचे कौतुक होत आहे. पण दुसऱ्या बाजूला काहीजण राहुल तेवतियाला ट्रोल देखील करत आहेत. ९७ धावांवर खेळत असणाऱ्या बटलरला तेवतियाने स्ट्राईक दिली नाही. तेवतियामुळे बटलरचे शतक हुकले, अनेक विक्रम मोडायची बटलरची संधी हुकली असे अनेकजण म्हणत आहेत.

गुजरात टायटन्सची प्लेईंग ११ -

साई सुदर्शन, शुभमन गिल (कर्णधार), जोस बटलर, शाहरुख खान, राहुल तेवतिया, अरशद खान, राशिद खान, रविश्रीनिवासन साई किशोर, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, इशांत शर्मा

दिल्ली कॅपिटल्सची प्लेईंग ११ -

अभिषेक पोरेल, करुण नायर, केएल राहुल, अक्षर पटेल (कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, आशुतोष शर्मा, विपराज निगम, मिचेल स्टार्क, कुलदीप यादव, मोहित शर्मा, मुकेश कुमार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raj Thackeray and Uddhav Thackeray: बाळासाहेबांच्या फोटोसमोर दोन्ही भावांची भेट; राज-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे चर्चा

Chanting mantras Brahma Muhurta: ब्रह्म मुहूर्तावर करा 'या' मंत्रांचा जप; नशीब क्षणार्धात बदलेल

Dnyanada Ramtirthkar: ज्ञानदा रामतीर्थकरचा प्रमोशन लूक, व्हाईट ड्रेसमध्ये दिल्या स्टायलिश पोज

Shahapur : अतिवृष्टीमुळे शेतातील बेडाघर कोसळले; झोपलेल्या शेतकऱ्याचा दबून मृत्यू

Shivneri To Vasai Fort: शिवनेरी किल्ल्यापासून वसई किल्ल्यापर्यंत कसे पोहोचाल? जाणून घ्या सर्व पर्याय

SCROLL FOR NEXT