Jos Buttler : 4,4,4,4,4...जोस बटलर पेटला, सलग पाच चौकार, मिचेल स्टार्कची चारही बाजूंनी केली धुलाई

Jos Buttler GT VS DC : नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये जोस बटलर शो पाहायला मिळाला. मिचेल स्टार्कच्या ओव्हरमध्ये बटलरने पहिल्या पाच बॉल्सवर पाच चौकार मारले. बटलर आजच्या सामन्यात शानदार फॉर्ममध्ये आहे.
Jos Buttler
Jos ButtlerX
Published On

IPL 2025 : गुजरात टायटन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरु आहे. सामन्यात शुबमन गिलने टॉस जिंकला आणि गुजरातने पहिली गोलंदाजी केली. दिल्लीने फलंदाजी करताना २० ओव्हर्समध्ये २०३ धावा केल्या. तसेच गुजरात टायटन्स समोर २०४ धावांचे आव्हान ठेवले. या सामन्यादरम्यान जोस बटलर दमदार फलंदाजी करताना दिसला.

२०४ धावांचे लक्ष गाठताना साई सुदर्शन आणि शुबमन गिल मैदानात उतरले. कॅप्टन गिल ७ धावांवर माघारी परतला. त्यानंतर इन-फॉर्म साई सुदर्शन ३६ धावांवर बाद झाला. त्यानंतर जोस बटलरआणि शेरफन रुदरफोर्ड यांनी मोर्चा सांभाळला. दोघांनी आक्रमक खेळी करत खेळ पुढे नेला. फॉर्ममध्ये असलेल्या दिल्लीच्या गोलंदाजांची बटलर आणि रुदरफोर्डने धुलाई केली.

Jos Buttler
Anaya Bangar: ते न्यूड फोटो मला पाठवायचे, संबंध ठेवायला सांगायचे, भारतीय क्रिकेटपटूंवर अनाया बांगरचे धक्कादायक आरोप

१५ व्या ओव्हरमध्ये मिचेल स्टार्क गोलंदाजी करण्यासाठी आला. जॉस बटलरने त्याच्या ओव्हरच्या पहिल्या ५ बॉल्समध्ये दमदार ५ चौकार मारले. ४ चौकार मारल्यानंतर ५ व्या बॉलवर बटलरने शॉट मारला. बॅकवर्ड स्वेअर लेगजवळ असलेल्या विपराज निगमने कॅच पकडण्याचा प्रयत्न केला. पण बॉल त्याच्या हातातून सुटला आणि बाउंड्री लाईनजवळ गेला आणि बटलरला पाचवा चौकार मिळाला. त्यानंतर बटलरला क्रॅम्प आल्याचे पाहायला मिळाले. पण तरीही बटलर टिकून राहिला.

Jos Buttler
KL Rahul : विराट, रोहित आणि धोनीला जमलं नाही, ते केएल राहुलने करुन दाखवलं; गुजरात विरुद्धच्या सामन्यात रचला मोठा इतिहास

गुजरात टायटन्सची प्लेईंग ११ -

साई सुदर्शन, शुभमन गिल (कर्णधार), जोस बटलर, शाहरुख खान, राहुल तेवतिया, अरशद खान, राशिद खान, रविश्रीनिवासन साई किशोर, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, इशांत शर्मा

दिल्ली कॅपिटल्सची प्लेईंग ११ -

अभिषेक पोरेल, करुण नायर, केएल राहुल, अक्षर पटेल (कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, आशुतोष शर्मा, विपराज निगम, मिचेल स्टार्क, कुलदीप यादव, मोहित शर्मा, मुकेश कुमार

Jos Buttler
Ishant Sharma : चेहरा सुकलेला, डोक्यावर भिजलेला टॉवेल.. इशांत शर्माला उन्हाचा त्रास सहन होईना; सामन्यातील 'हा' फोटो व्हायरल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com