gt vs dc ipl 2024 rishabh pant stumped shahrukh khan controversy amd2000
gt vs dc ipl 2024 rishabh pant stumped shahrukh khan controversy amd2000 twitter
क्रीडा | IPL

GT vs DC ,IPL 2024: शाहरुख खानच्या स्टम्पिंगवरुन पेटला वाद! अंपायर की रिषभ; नेमकी चूक कोणाची?

Ankush Dhavre

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने गुजरात टायटन्स संघाचा एकतर्फी पराभव केला आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या गुजरात टायटन्स संघाचा डाव अवघ्या १७.३ षटकात ८९ धावांवर आटोपला. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या दिल्ली कॅपिटल्स संघाने हे आव्हान ८.५ षटकात पूर्ण केले. या विजयाचा दिल्ली कॅपिटल्सला मोठा फायदा झाला आहे. हा संघ ७ पैकी ३ सामने जिंकून गुणतालिकेत सहाव्या स्थानी पोहोचला आहे. तर पराभूत झालेला गुजरात टायटन्सचा संघ गुणतालिकेत सातव्या स्थानी पोहोचला आहे.

नेमकं काय घडलं?

या सामन्यानंतर सोशल मीडियावर एका वादाची तुफान चर्चा सुरू आहे. गुजरात टायटन्स संघाचा फलंदाज शाहरुख खान हा दिल्ली कॅपिटल्स संघातील गोलंदाज ट्रीस्टन स्टब्सच्या गोलंदाजीवर बाद झाला. मात्र तो बाद झाल्याचे फोटो आणि व्हिडिओ व्हायला होताच नेटकऱ्यांनी रिषभ पंतवर चिटिंग केल्याचा आरोप केला आहे.

मात्र या सामन्यात त्याला बाद घोषित करण्यात आलं आहे. व्हिडीओमध्ये पाहिलं असता असं दिसून येत आहे की, चेंडू रिषभ पंतच्या हातात आलाच नाही. अंपायरने हा निर्णय देण्यासाठी बराच वेळ घेतला. वेगवेगळ्या अँगेलने पाहिल्यानंतर अखेर त्याला बाद घोषित करण्यात आलं.

गुजरातचा शानदार विजय...

गुजरात टायटन्सच्या होम ग्राऊंडवर खेळताना दिल्ली कॅपिटल्सने टॉस जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या गुजरात टायटन्स संघाकडून राशिद खानने सर्वाधिक ३१ धावांची खेळी केली. त्याला वगळता इतर कुठल्याही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. गुजरातचा संपूर्ण डाव अवघ्या ८९ धावांवर आटोपला. या धावांचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्स संघाकडून अभिषेक पॉरेलने १५, मॅकगर्कने २० धावांची खेळी केली. तर शेवटी रिषभ पंतने नाबाद १६ धावा करत संघाला ६ गडी राखून विजय मिळवून दिला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope Today : 'या' राशींच्या लोकांची होणार भरभराट, तुमची रास?

Mahrashtra Election: 26 मतदारसंघात मतदानाचा टक्का घसरला; मतदानाची वाढ आणि घट कोणाच्या पथ्यावर ?

19 स्पीकर्स, 8 एअरबॅग्ज आणि माईल्ड माइल्ड हायब्रिड इंजिन; Audi Q7 Bold Editio भारतात लॉन्च

Maharashtra Election: संथगतीनं मतदानावरून राजकारण तापलं; मुख्यमंत्री शिंदेंचे चौकशीचे आदेश

Amit Shah: पाचव्या टप्प्यातील मतदानानंतर भाजप 310 जागा जिंकलीय, अमित शहांचा मोठा दावा

SCROLL FOR NEXT