Gujarat Titans vs Delhi Capitals: IPL 2024 च्या ३२ वा सामना गुजरात टायटन्स आणि दिल्ली कॅपिटल्सशी होत आहे. या सामन्यात दिल्लीचे वर्चस्व राहत दिल्लीच्या गोलंदाजांसमोर गुजरातच्या संघाने नांगी टाकली. गुजरातचा अख्खा संघ मात्र ८९ धावांवर गारद झाला.
दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंतने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पंतचा हा निर्णय योग्य ठरवत गोलंदाजांनी गुजरातला गुडघे टेकण्यास भाग पाडलं. गुजरातचा संघ १७.३ षटकांत अवघ्या ८९ धावांत गारद झाला. हा सामना जिंकण्यासाठी दिल्लीला ४९ धावांचे लक्ष्य मिळाले आहे.
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवरील या मोसमातील हा चौथा सामना आहे. यात शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली गुजरातने घरच्या मैदानावर ३ पैकी २ सामने जिंकले आहेत.गेल्या सामन्यात त्यांनी राजस्थान रॉयल्सचा ३ गडी राखून पराभव केला होता. यातील शेवटचा विजय राजस्थान रॉयल्सविरुद्ध झाला. तर दिल्ली कॅपिटल्सची स्थिती फारशी चांगली नाही आणि संघाने ६ पैकी ४ सामने गमावलेत. परंतु शेवटच्या सामन्यात त्यांनी लखनऊला त्यांच्या घरच्या मैदानावर पराभूत केले होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.