Raj Thackeray: शरद पवार म्हणजे धक्कातंत्र, डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा निशाणा

Delimitation Bill: शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा देणार असल्याची चर्चा सुरू आहे. यावरूनच राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली.
Raj Thackeray: शरद पवार म्हणजे धक्कातंत्र, डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा निशाणा
Raj Thackeray On Sharad Pawar Saam Tv
Published On: 

डिलिमिटेशन विधेयकावरून राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. शरद पवारांची राष्ट्रवादी डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा देण्याची शक्यता आहे. याससंदर्भात शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या बैठका सुरू आहेत. इंडिया आघाडीविरोधात जाऊन शरद पवारांची राष्ट्रवादी डिलिमिटेशन विधेयकाच्या बाजूने मतदान करणार असल्याची चर्चा सुरू आहे. यावरूनच आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शरद पवारांवर टीका केली. 'शरद पवार म्हणजे धक्कातंत्र. अजित पवार म्हणजे सत्तेच्या दिशेने गेलेली पहिली टीम आणि आता राष्ट्रवादीची दुसरी टीम सत्तेकडे रवाना झाली.', असे म्हणत राज ठाकरे यांनी शरद पवारांवर निशाणा साधला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.