Maharashtra News Live Update: नागपूरच्या शाश्वत पाणीपुरवठ्यासाठी १४०० कोटींच्या कोलार-कन्हान बॅरेज प्रकल्पाला राज्य सरकारची प्रशासकीय मंजुरी

Marathi Breaking Live Headlines Updates : डिलिमिटेशन विधेयक, इंडिया आघाडी, लोकसभेचं हिवाळी अधिवेशन अपडेट, शरद पवार हेल्थ अपडेट, राज ठाकरे पत्रकार परिषद, सुप्रिया सुळे, राष्ट्रवादी काँग्रेस, देश- विदेशातील महत्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...
Maharashtra News Live Update
Maharashtra News Live UpdateSaam Tv News

Nagpur: नागपूरच्या शाश्वत पाणीपुरवठ्यासाठी १४०० कोटींच्या कोलार-कन्हान बॅरेज प्रकल्पाला राज्य सरकारची प्रशासकीय मंजुरी

- नागपूरच्या शाश्वत पाणीपुरवठ्यासाठी १४०० कोटींच्या कोलार-कन्हान बॅरेज प्रकल्पाला राज्य सरकारची प्रशासकीय मंजुरी

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रकल्पाचा मार्ग मोकळा

- शहरातील सार्वजनिक विहिरींचाही पिण्याच्या पाण्यासाठी वापर करता येईल, असे नियोजन करण्याचे बावनकुळे यांचे निर्देश

- नागपूरकरांना मालकीहक्काचे पट्टे आणि घरे देण्यासाठी मार्चपर्यंत कालबद्ध कार्यक्रम राबवण्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे निर्देश

- महापालिका आणि राज्य सरकारच्या जागेवर राहणाऱ्या सर्व पात्र नागरिकांना मिळणार मालकीहक्काचे पट्टे

Amravati: मेळघाटातील प्रस्तावित जलविद्युत प्रकल्पा विरोधात युवक काँग्रेस आक्रमक

मेळघाटातील प्रस्तावित जलविद्युत प्रकल्पा विरोधात युवक काँग्रेस आक्रमक

प्रकल्पाविरोधात आंदोलनाची सुरुवात

प्रत्येक गावात कॉर्नर बैठका घेऊन आदिवासींमध्ये जनजागृती मोहीम

Washim: वाशिम रेल्वे स्थानकावर प्रवाशांची सुरक्षा वाऱ्यावर

वाशिम रेल्वे स्थानकावर अल्पवयीन चोरट्यांची दहशत पाहायला मिळत आहे.

व्हाइटनरची नशा करून प्रवाशांकडून जबरीने पैसे हिसकावून घेत ब्लेडने हातावर वार केल्याची घटना समोर आली आहे.

या हल्ल्यात गोपाल पांडे हा तरुण गंभीर जखमी झाला असून, त्याला पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

दरम्यान, रेल्वे पोलिसांनी अल्पवयीन चोरट्याला ताब्यात घेतलं असून पुढील तपास सुरू आहे.

Yavatmal: यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेची सभा ऐनवेळी रद्द

यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची उद्या होणारी नियोजित सभा रद्द करण्यात आली आहे.

बँकेचे अध्यक्ष तथा खासदार संजय देशमुख हे अधिवेशनासाठी दिल्लीला गेल्याने ऐनवेळी बँकेची सभा अध्यक्षांच्या सूचनेवरून तांत्रिक कारणास्तव रद्द करण्यात येत असल्याचे पत्र संचालकांना पाठविण्यात आले आहे.

विभागीय अध्यक्ष, समित्यांची निवड लांबणीवर पडली आहे.

Ratnagiri - लाडक्या बहिणींना २१०० रुपये योग्य वेळी देणार – उदय सामंत

रत्नागिरी - लाडक्या बहिणींना २१०० रुपये योग्य वेळी देणार – उदय सामंत

विधानसभेला १५०० रुपयांचे २१०० रुपये करण्याचा शब्द आम्ही पाळणार!

योग्य वेळी लाडक्या बहिणींना २१०० रुपये दिले जातील

मंत्री उदय सामंत यांचा लाडक्या बहिणींना शब्द

लाडकी बहीण योजना शंभर टक्के सुरू राहणार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.