IPL Winner Prediction: लिहून घ्या, हाच संघ जिंकणार IPL ची ट्रॉफी! दिग्गज खेळाडूची मोठी भविष्यवाणी

Ricky Ponting IPL Winner Prediction: दिल्ली कॅपिटल्स संघाचा हेड कोच रिकी पाँटींगने आयपीएल २०२४ स्पर्धेच्या जेतेपदाबाबत मोठी भविष्यवाणी केली आहे.
delhi capitals head coach predicts the winner of ipl 2024 amd2000
delhi capitals head coach predicts the winner of ipl 2024 amd2000twitter

आयपीएल स्पर्धेत आतापर्यंत ३१ सामने खेळले गेले आहेत. यादरम्यान अनेक चुरशीच्या लढती पार पडल्या आहेत. आतापर्यंत अनेक मोठ मोठे रेकॉर्ड बनवले गेले आहेत. तसेच मोडले देखील गेले आहेत. या हंगामात सनरायझर्स हैदराबादने सर्वात मोठ्या धावसंख्येचा रेकॉर्ड बनवला गेला. तर राजस्थान रॉयल्सने स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात मोठ्या धावसंख्येचा यशस्वी पाठलाग केला. दरम्यान आता दिल्ली कॅपिटल्स संघाचा हेड कोच रिकी पाँटींगने आयपीएल २०२४ स्पर्धेच्या जेतेपदाबाबत मोठी भविष्यवाणी केली आहे.

याबाबत बोलताना रिकी पाँटींग म्हणाला की, ' तु्म्ही जर पाहिलं, तर आयपीएल आणि बिग बॅश लीगसारख्या स्पर्धा त्याच संघाने जिंकल्या आहेत, ज्या संघाचा गोलंदाजी अटॅक चांगला आहे. मात्र सध्या आयपीएलमध्ये जे काही सुरु आहे. ते पाहता असं वाटतंय की, जो संघ गोलंदाजांवर हल्लाबोल करेल. तोच संघ जेतेपदावर नाव कोरेल. माझ्या मते चांगल्या गोलंदाजी आक्रमणासमोर जो संघ आक्रमक फलंदाजी करेल. तो संघ जेतेपदाचा दावेदार ठरेल.'

आयपीएल २०२४ स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्स संघाची कामगिरी..

रिषभ पंतच्या नेतृत्वाखाली खेळत असलेल्या दिल्ली कॅपिटल्स संघाला या हंगामात हवी तशी कामगिरी करता आलेली नाही. या संघाला पंजाब किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स संघाकडून पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर तिसऱ्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने चेन्नई सुपर किंग्जला हरवत विजयाची चव चाखली. हा विजय मिळवल्यानंतर दिल्ली कॅपिटल्स संघाला पुढील दोन्ही सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात या संघाला पराभवाची चव चाखावी लागली.

दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सला पराभूत करत या हंगामातील दुसरा विजय मिळवला. दिल्लीचा पुढील सामना गुजरात टायटन्सविरुद्ध होणार आहे. हा सामना अहमहाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिमयवर होणार आहे. हा सामना जिंकून दिल्लीच संघ दमदार कमबॅक करण्याच्या प्रयत्नात असणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com