

टीम इंडियाला दुसऱ्या टेस्ट सामन्यात मोठा धक्का बसलाय. वेगवान गोलंदाज आकाशदीप दुसऱ्या टेस्ट सामन्यातून बाहेर झाला आहे. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी फलंदाजी करताना त्याच्या हेल्मेटवर चेंडू लागला होता. दुखापत झाल्यानंतरही त्याने फलंदाजी सुरू ठेवत २९ रन्स केले. पण बीसीसीआयने आकाश दीप दुसऱ्या टेस्टमध्ये पुढे खेळणार नसल्याचे स्पष्ट केलंय. त्याच्या जागी प्रसिद्ध कृष्णाला पर्यायी खेळाडू म्हणून संधी देण्यात आलीये.
क्राइस्टचर्च टेस्ट सामन्याच्या तिसऱ्या दिवशी टीम इंडियाच्या डावात आकाशदीप नवव्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता. भारताच्या डावातील ५३व्या ओव्हरमध्ये न्यूझीलंडचा काइल जेमिसन गोलंदाजी करत होता. या ओव्हरमध्ये जेमिसनचे दोन वेगवान बाऊन्सर आकाशदीपच्या हेल्मेटवर जोरात आदळला होता.
ओव्हरमधील पहिला चेंडू शॉर्ट लेंथवर होता. त्यावर आकाशदीपने पुल शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा शॉर्ट उशिरा बसला आणि चेंडू बॅटची कट लागून तो हेल्मेटवर आदळला. याच ओव्हरमधील पाचव्या चेंडूवर पुन्हा आकाशदीपच्या हेल्मेटला जोरदार धक्का बसला. यावेळी चेंडूचा परिणाम अधिक होता. त्यानंतर फिजिओ मैदानावर आला आणि आकाशदीपची तपासणी केली. तपासणीनंतरही आकाशदीपने फलंदाजी सुरू ठेवली.
आकाशदीप टीममधून बाहेर झाल्याने मोठं नुकसान झालंय. पहिल्या डावात तो भारताचा सर्वाधिक प्रभावी गोलंदाज ठरला होता. त्याने ३१.३ षटकांत ९९ रन्स देत ५ विकेट्स घेतल्या होत्या. आकाशदीपने टॉम लॅथम, रचिन रवींद्र, नॅथन स्मिथ, काइल जेमिसन आणि मॅट हेन्री यांना बाद केलं होतं. त्याच्या कामगिरीमुळे भारतीय टीमला पहिल्या चांगली सुरुवात मिळाली होती.
आकाशदीपच्या जागी प्रसिद्ध कृष्णाला पर्यायी खेळाडू म्हणून टीममध्ये स्थान देण्यात आलंय. दुसऱ्या टेस्ट सामन्यात प्रसिद्ध कृष्णाचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश नव्हता. पण त्याने पहिल्या सामन्यात त्याच्या गोलंदाजीने प्रभाव पाडला होता. पहिल्या टेस्टमध्ये प्रसिद्ध कृष्णाने एकूण ३ विकेट्स घेतल्या होत्या. त्याची लाईन आणि लेंथ चांगली असल्याने तो भारताचा प्रभावी गोलंदाज ठरला होता. बीसीसीआयची वैद्यकीय टीम आकाशदीपच्या फिटनेसवर लक्ष ठेवून आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.