IND vs NZ 2nd Test: टीम इंडिया बॅकफूटवर! राहुल, गिल, पंतचा फ्लॉप शो; 116 रन्सवर 6 गडी तंबूत, 240 धावांनी पिछाडीवर

India vs New Zealand Test: न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्ये भारताची फलंदाजी कोलमडली आहे. दुसऱ्या दिवसअखेर टीम इंडियाने 6 विकेट्स गमावत 116 धावा केल्या असून भारत अजूनही 240 धावांनी पिछाडीवर आहे. आकाश दीपने न्यूझीलंडच्या पहिल्या डावात पाच विकेट्स घेतल्या.
IND vs NZ 2nd Test
IND vs NZ 2nd Testsaam tv
Published On: 

न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या टेस्ट सामन्यात टीम इंडियाची अवस्था बिकट असल्याचं दिसतंय. ख्राइस्टचर्चमध्ये सुरू असलेल्या सामन्याच्या दुसऱ्या दिवसअखेर भारताने पहिल्या डावात 6 विकेट्स गमावून 116 रन्स केलेत. न्यूझीलंडने पहिल्या डावात 356 रन्स केले होत्या. त्यामुळे भारत अजूनही 240 रन्सने पिछाडीवर आहे. ध्रुव जुरेल 7 रन्सवर खेळत असून, वॉशिंग्टन सुंदर दिवसाच्या शेवटच्या चेंडूवर बाद झाल्याने तिसऱ्या दिवशी भारताला नव्या फलंदाजासह खेळ सुरू करावा लागणार आहे.

भारताची सुरुवात खराब

भारताच्या पहिल्या डावाची सुरुवात अत्यंत खराब झाली. पहिल्या सेशनमध्येच भारताने यशस्वी जयस्वाल (0), देवदत्त पडिक्कल (21) आणि कर्णधार शुभमन गिल (17) यांचे विकेट्स गमावले. त्यामुळे टीम इंडिया अडचणीत आलेली दिसली.

IND vs NZ 2nd Test
IND vs NZ 2nd Test: न्यूझीलंड 110/1 वरून 110/4; 18 चेंडूंत टीम इंडियाने कसा फिरवला सामना? नेमकं काय घडलं पाहा Video

दुसऱ्या सेशनमध्येही भारताला मोठा दिलासा मिळाला नाही. ऋषभ पंत 23, केएल राहुल 25 आणि वॉशिंग्टन सुंदर 10 रन्स करून बाद झाले. दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताची अवस्था 6 विकेट्सवर 116 रन्स अशी झाली. न्यूझीलंडकडून काइल जेमिसन आणि जेकब डफी यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या, तर मॅट हेन्रीला 1 विकेट मिळाली.

न्यूझीलंडचा पहिला डाव 356 रन्सवर आटोपला

दुसऱ्या दिवसाच्या सुरुवातीला न्यूझीलंडने 5 विकेट्सवर 246 रन्सपासून खेळायला सुरुवात केली. पण भारतीय गोलंदाजांनी उर्वरित फलंदाजांना जास्त वेळ मैदानावर टिकू दिलं नाही. न्यूझीलंडचा पहिला डाव 356 रन्सवर आटोपला.

टॉम ब्लंडेलने 211 चेंडूंत 89 धावा करत न्यूझीलंडकडून सर्वाधिक धावा केल्या. ग्लेन फिलिप्सला कालच्या स्कोरमध्ये आणखी भर घालता आली नाही. तो 36 रन्सवर बाद झाला. त्यानंतर नॅथन स्मिथने 26, काइल जेमिसनने 19 आणि मॅट हेन्रीने 19 रन्स करत टीमच्या स्कोरमध्ये भर घातली.

IND vs NZ 2nd Test
Jasprit Bumrah: रोहित शर्मा झाला कॅप्टन; बुमराहने घेतला मोठा निर्णय, थेट मुंबई इंडियन्सला कळवला नकार

आकाश दीपची भेदक गोलंदाजी

भारताकडून आकाश दीपने सर्वाधिक 5 विकेट्स घेतल्या. त्याने 99 रन्स देत 5 फलंदाजांना बाद केलं. गुरनूर बरार आणि अंशुल कंबोज यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या, तर वॉशिंग्टन सुंदरला 1 विकेट मिळाली. भारताचा अनुभवी गोलंदाज जसप्रीत बुमराहला मात्र एकही विकेट घेता आली नाही.

IND vs NZ 2nd Test
Ind vs NZ 2nd Test: पहिल्या दिवसअखेर न्यूझीलंडच्या ५ विकेट्स, ब्लंडेल- फिलिप्सने डाव सावरला, आकाश दीपची भेदक गोलंदाजी!

सिरीज जिंकण्यासाठी भारतासमोर मोठं आव्हान

दोन सामन्यांची टेस्ट सिरीज सध्या 0-0 अशी बरोबरीत आहे. त्यामुळे ख्राइस्टचर्चमध्ये होणारा हा सामना सिरीजसाठी निर्णायक ठरणार आहे. 2009 नंतर न्यूझीलंडमध्ये पहिली टेस्ट मालिका जिंकण्याचा भारताचा प्रयत्न आहे. तर न्यूझीलंडची टीम घरच्या मैदानाचा फायदा घेत सिरीज जिंकण्याच्या तयारीत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.