Shubman Gill: होम ग्राऊंडवरील दारुण पराभवानंतर गिल भडकला! कोणावर फोडलं पराभवाचं खापर?

Shubman Gill Statement, GT vs DC IPL 2024: गुजरात टायटन्स आणि दिल्ली कॅपिटल्स या दोन्ही संघांमध्ये झालेल्या सामन्यात गुजरातला एकतर्फी पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. दरम्यान या सामन्यानंतर काय म्हणाला शुभमन गिल? जाणून घ्या.
Shubman gill gets angry after defeat against delhi capitals in gt vs dc match amd2000
Shubman gill gets angry after defeat against delhi capitals in gt vs dc match amd2000twitter

गुजरात टायटन्स आणि दिल्ली कॅपिटल्स या दोन्ही संघांमध्ये झालेल्या सामन्यात गुजरातला एकतर्फी पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या सामन्यात गुजरातचा ८.५ षटकात पराभव झाला. दिल्लीला हा सामना जिंकण्यासाठी केवळ ९० धावांची गरज होती. हे आव्हान दिल्लीने सहज पूर्ण केलं. या पराभवानंतर गुजरात टायटन्सचा संघ गुणतालिकेत सातव्या स्थानी घसरला आहे. गुजरातला आतापर्यंत खेळलेल्या ७ सामन्यांपैकी केवळ ३ सामने जिंकता आले आहेत.

दरम्यान या पराभवानंतर बोलताना शुभमन गिल म्हणाला की, ' आमची फलंदाजी खूप सामान्य होती. मात्र आम्हाला यातून बाहेर पडून पुढे जावं लागेल. ही खेळपट्टी वाईट नव्हती. जर तुम्ही पाहिलं तर, फलंदाज आपल्याच चुकीमुळे बाद होऊन माघारी परतले. आमच्या फलंदाजांनी चुकीचे फटके खेळले यामुळे त्यांना बाद व्हावं लागलं. जेव्हा तुमचा विरोधी संघ अवघ्या ८९ धावांचा पाठलाग करत असतो त्यावेळी जास्त पर्याय उपलब्ध नसतात. अशा वेळी जर गोलंदाजांनी डबल हॅट्रिक घेतली असती, तर नक्कीच आम्ही सामन्यात कमबॅक केलं असतं.'

Shubman gill gets angry after defeat against delhi capitals in gt vs dc match amd2000
IPl 2024 : दिल्लीच्या विजयानंतर Points table मध्ये उलटफेर; राजस्थान, कोलकाताचं झालं काय?

तसेच तो पुढे म्हणाला की, ' आतापर्यंत अर्धा हंगाम संपलाय. आम्ही ३ सामने जिंकले आहेत. आम्हाला पुढील ७ सामन्यांपैकी ५-६ सामने जिंकावे लागणार आहेत. तेव्हाच आम्हाला प्लेऑफमध्ये जाण्याची संधी मिळू शकते.' सध्या गुजरात टायटन्सचा संघ गुणतालिकेत सातव्या स्थानी आहे. गुजरात टायटन्स संघाच्या या हंगामातील कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर, या संघाने मुंबई इंडियन्स, सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स संघाला पराभूत केलं आहे. तर चेन्नई सुपर किंग्ज,लखनऊ सुपर जायंट्स, पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्सविरुध्द झालेल्या सामन्यात या संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे.

Shubman gill gets angry after defeat against delhi capitals in gt vs dc match amd2000
IPL Winner Prediction: लिहून घ्या, हाच संघ जिंकणार IPL ची ट्रॉफी! दिग्गज खेळाडूची मोठी भविष्यवाणी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com