team india 
क्रीडा

Shardul Thakur: टीम इंडियासाठी गुड न्यूज! बॉर्डर- गावसकर ट्रॉफी गाजवणारा खेळाडू कमबॅकसाठी सज्ज

Ankush Dhavre

भारत आणि बांगलादेश या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. ही मालिका झाल्यानंतर भारतीय संघाला न्यूझीलंडविरुद्ध ३ कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे.

या दोन्ही मालिका झाल्यानंतर बॉर्डर - गावसकर ट्रॉफीसाठी भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. यावेळी भारतीय संघ बॉर्डर- गावसकर मालिका जिंकून विजयाची हॅट्रीक करण्याच्या प्रयत्नात असणार आहे. दरम्यान या मालिकेपूर्वी भारतीय संघासाठी आनंदाची बातमी समोर आली आहे.

भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू शार्दुल ठाकुर आयपीएल २०२४ स्पर्धेत खेळताना दिसून आला होता. या स्पर्धेनंतर तो दुखापतग्रस्त झाला. दरम्यान त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती.

आता तो या दुखापतीतून सावरला असून कमबॅक करण्यासाठी सज्ज झाला आहे. माध्यमातील वृत्तानुसार,शार्दुल ठाकुर इराणी ट्रॉफी स्पर्धेतून कमबॅक करु शकतो. या स्पर्धेत तो मुंबईकडून खेळताना दिसेल. नुकताच चो केएससीए सचिव आणि मुंबई यांच्याच झालेल्या सामन्यात खेळताना दिसून आला होता. मात्र या सामन्यात त्याला हवी तशी कामगिरी करता आलेली नाही.

इराणी ट्रॉफीतून करणार कमबॅक

इराणी ट्रॉफीतून येत्या १ ते ५ ऑक्टोबर दरम्यान पार पडणार आहे. हा सामना लखनऊच्या इकाना स्टेडियमवर होणार आहे. हा सामना रणजी ट्रॉफी विजेता संघ मुंबई आणि रेस्ट ऑफ इंडिया या दोन्ही संघांमध्ये होईल. या सामन्यात शार्दुल ठाकूर मुंबईकडून खेळताना दिसू शकतो, असा अंदाज वर्तवला जात आहे.

ही भारतीय संघासाठी आनंदाची बाब आहे. कारण गेल्यावेळी जेव्हा भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेला होता. त्यावेळी शार्दुलने फलंदाजीत आणि गोलंदाजीत मोलाची भूमिका बजावली होती. भारतीय संघाला यावेळीही अशा खेळाडूची गरज आहे, जो फलंदाजीसह गोलंदाजीतही योगदान देईल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fast Benefits: उत्तम आरोग्यासठी उपवास आहे 'वरदान'

Diwali: दिवाळीचा घराचा प्रत्येक कोपरा सजवा अशा पद्धतीने;होईल आर्थिक भरभराट

Maharashtra News Live Updates: उपमुख्यमंत्री फडणवीस अॅक्शन मोडवर, सलमान खान धमकीनंतर गृह विभागाला निर्देश

Armaan Malik Accident: 'मरता मरता वाचलो...' बिग बॉस फेम अभिनेत्याच्या कारचा झाला अपघात; Video केला शेअर

मासिक पाळीविषयीचे समज आणि गैरसमज, तज्ज्ञ डॉक्टरांनी काय सांगितलं, वाचा सविस्तर!

SCROLL FOR NEXT