Maharashtra News Live Updates: पपई पिकावर मोझॅक रोगाच्या प्रादुर्भाव, शेतकरी हवालदिल

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates 18 October 2024: आज शुक्रवार दिनांक १८ ऑक्टोबर २०२४ महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, विधानसभा निवडणुकासंदर्भातील अपडेट्स, जागावाटप, मुंबई-पुण्यासह राज्यातील महत्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Maharashtra News Live Updates:
Maharashtra Live News UpdatesSaam tv

Nandurbar News:  पपई पिकावर मोझॅक रोगाच्या प्रादुर्भाव, शेतकरी हवालदिल

नंदुरबार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पपईची लागवड करण्यात येत असते, खरीप हंगामात दहा हजार हेक्टर पेक्षा अधिक क्षेत्रावर पपाची लागवड करण्यात आली आहे मात्र पपई पिकावर मोझॅक रोगाच्या प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. पपई पीक ऐन काढणीच्या वेळेस पपईवर रोगाच्या प्रादुर्भाव झाला आहे. शेतकऱ्याने मोठ्या कष्टाने जगवले आहेत यावर्षी पाऊस सोबतच कोणाच्या देखील तडाका वाढत आहे त्यामुळे निसर्गाशी दोन हात करत शेतकऱ्यांनी आपलं एका जगवले आहेत मात्र रोगाच्या पादुर्भावामुळे शेतकरी आता आर्थिक अडचणीत सापडला असून या अडचणीतून मार्ग कसा काढावा असा प्रश्न आता शेतकऱ्या राजासमोर उपस्थित झाला आहे.

Nashik News: - भाजपला मोठा धक्का बसणार? मंत्री गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय शरद पवार गटाच्या वाटेवर

- नाशिकमध्ये भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता

- मंत्री गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय गणेश गीते शरद पवार गटाच्या वाटेवर

- नाशिक महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती सभापती गणेश गीते तुतारी घेण्याची शक्यता

- मुंबईत आज घेणार शरद पवारांची भेट

- नाशिक पूर्व मतदारसंघातून गणेश गीते निवडणूक लढण्यास इच्छुक

- नाशिक पूर्व मध्ये राहुल ढिकले आहेत भाजपचे सध्या विद्यमान आमदार

- भाजपाकडून उमेदवारी मिळत नसल्याने गणेश गीते राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या वाटेवर

काँग्रेस नेत्यांच्या नावाने लाडकी बहीण संदर्भात बनावट पोस्ट

आमचं सरकार आल्यावर लाडक्या बहिणींना मिळणारे पैसे बंद करणार अश्या आशयाचे काँग्रेसचे माजी मंत्री सुनील केदार व रणजित कांबळे यांचे फोटो वापरत सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल करण्यात आलीय. देवळी विधानसभेचे भाजपचे संभाव्य उमेदवार यांच्या समर्थक ग्रुपवरून ही पोस्ट व्हायरल करण्यात आलीय.

सांगली.. प्रभाकर पाटील कमळ ऐवजी घड्याळ घेऊन उतरणार मैदानात!

भाजपचे माजी खासदार संजयकाका पाटील यांच्या सुपुत्र प्रभाकर पाटील हे सांगलीच्या तासगाव कवठेमहांकाळ मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत,मात्र जागा वाटपाच्या तिढ्यात भाजपकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता कमी असल्याने ते राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून मैदानात असतील अशी चर्चा सुरू झाली आहे,त्यामुळे तासगाव- कवठेमहांकाळ मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार,अशी लढत होण्याची शक्यता आहे.

जम्मू काश्मीर राज्याला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याचा प्रस्ताव कॅबिनेट बैठकीत मंजूर

वसतीगृहात अल्पवयीन मुलीवर अत्याचार; तिघींचा विनयभंग

परभणी शहरातील वसमत रोड वरीलसत्कार कॉलनी येथील एका निवासी वस्तीगृहात १५ वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे.

विधानसभा निवडणुका सांगता सभेला शिवाजी पार्क ऑन डिमांड

७ नोव्हेंबर साठी शिवाजी पार्क सभेच्या मैदानासाठी ४ अर्ज दाखल...

मनसे, शिवसेना ,शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि भाजप या चारही राजकीय पक्षातर्फे शिवाजी पार्क मैदानासाठी अर्ज

मुंबई महानगरपालिकेच्या नियमानुसार पहिला अर्ज दाखल करणाऱ्याला मैदान मिळण्याबाबत प्राधान्य...

मनसेनं प्रथम अर्ज केल्यामुळे मनसेला शिवाजी पार्क मैदान मिळणार असल्याची शक्यता...

अमित ठाकरे यांना विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यासाठी दादर माहीम मतदार संघाबाबत चाचपणी

भाजपचे अनेक नाराज पदाधिकारी आज ठाकरेंची मशाल घेणार

विधानसभेचे आचारसंहिता लागताच संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड-सोयगाव मतदारसंघात मंत्री अब्दुल सत्तार विरोधात शिवसेना उद्धव ठाकरे गटांनी दंड थोपटले आहेत. त्यासाठी भाजपमध्ये नाराज असलेले प्रमुख पदाधिकारी आज ठाकरे शिवसेनेत प्रवेश करीत आहेत. भाजपचे प्रदेश चिटणीस सुरेश बनकर हे आज मुंबईत मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ते शिवबंधन हाती बांधणार आहेत. त्यामुळे सिल्लोडमध्ये भाजपला मोठी खिंडार पडणार आहे. मागील पंधरा वर्षांपासून या मतदारसंघावर मंत्री अब्दुल सत्तार यांनी एकहाती सत्ता प्रस्थापित केलेली आहे. स्थानिक भाजपचे पदाधिकारी, नेते विरुद्ध अब्दुल सत्तार असा संघर्ष गेल्या काही महिन्यांपासून वाढला आहे. अशामध्ये युती असल्यामुळे भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या मागण्यांकडे भाजपचे वरिष्ठ नेते दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप पदाधिकाऱ्यांनी करीत आता एकेक पदाधिकारी शिवसेना उद्धव ठाकरे गटात सहभागी होणार अशी चर्चा आहे.

अखेर जुन्नरचे आमदार अतुल बेनकेंनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे घड्याळ हाती घेत प्रचाराचा नाराळ फोडलाय

जुन्नरचे आमदार अतुल बेनके अजित पवारांची साथ सोडुन शरद पवारांची तुतारी हाती घेणार असल्याच्या चर्चेला आता आमदार बेनकेंनी पुर्ण विराम देत आज सकाळी ओझरच्या विघ्नहर्ता गणपती मंदिरात प्रचाराचा नारळ फोडला.

नाशिकमधील भाजपचा अंतर्गत कलह चव्हाट्यावर

- नाशिकमधील भाजपचा अंतर्गत कलह चव्हाट्यावर

- नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात इच्छुकांनी विद्यमान आमदार सीमा हिरे यांच्या विरोधात थोपटले दंड

- नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातील अंतर्गत कलह चव्हाट्यावर

- भाजपच्या इच्छुकांनी विद्यमान आमदारांविरोधात बांधली मोट

- रात्री उशिरा भाजपच्या इच्छुकांची बैठक

- पत्रकार परिषद घेऊन व्यक्त केली विद्यमान आमदारांविरोधात नाराजी

- भाजपचे ज्येष्ठ नेते लक्ष्मण सावजी हे देखील इच्छुकांच्या बैठकीला उपस्थित

- विद्यमान आमदार सीमा हिरे यांच्या ऐवजी इच्छुकांपैकी कुणालाही उमेदवारी द्या

- नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातील इच्छुकांची पक्षश्रेष्ठींकडे मागणी

- नाशिकमधील अंतर्गत वाद मिटवण्याचं भाजपाच्या पक्ष श्रेष्ठींसमोर आव्हान

मावळ तालुक्यात महायुती मध्ये उमेदवारी वरून रस्सीखेच, मविआकडे उमेदवारच नाही 

विधानसभेचे बिगुल वाजताच आता उमेदवारी साठी सर्वच पक्षात मोठी रस्सीखेच पहायला मिळत आहे. मावळ विधानसभा मतदारसंघात देखील ही रस्सीखेच सर्वच पक्षात आहे. मावळ हा भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. मात्र 2019 साली राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपच्या बालेकिल्लाला सुरुंग लावला आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला आमदार मावळ तालुक्याला मिळाला. मात्र आता या विधानसभेला महायुती मधीलच सर्व पक्षांनी या मतदारसंघावर दावा केला आहे.

भाजपचे माजी आमदार सुरेश धस यांनी घेतली मनोज जरांगे यांची भेट

भाजपचे माजी आमदार सुरेश धस यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतलीय. रात्री उशिरा माजी आमदार सुरेश धस यांनी अंतरवाली सराटीत येऊन मनोज जरांगेंची भेट घेत त्यांच्यासोबत चर्चा केलीय. सुरेश धस आणि मनोज जरांगे यांच्यात काही वेळ चर्चा झाल्याची माहिती असून विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर धस यांनी अचानक मनोज जरांगेंची भेट घेतल्याने या भेटीला मोठं महत्त्व प्राप्त झालंय. भाजपचे आष्टी पाटोदा मतदार संघाचे माजी आमदार सुरेश धस यांनी अचानक जरांगेंची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय.

राष्ट्रवादी एकसंघ व्हायला हवी. ..मी प्रयत्न करणार आमदार बेनकेंना विश्वास

राष्ट्रवादी कॉग्रेस एकसंघ व्हायला पाहिजे यासाठी मी शेवटपर्यत लढणार असा विश्वास जुन्नरचे अजित पवार गटाचे आमदार अतुल बेनकेंनी मंत्री दिलीप वळसेपाटीलांसमोर व्यक्त करत शरद पवार आणि अजित पवार आपलेच असल्याचे मोठे विधान आमदार बेनकेंनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर केल्याने चर्चेला उधाण आले.

रायगड जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का

ऐन निवडणूकीच्या तोंडावर रायगड जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का बसतो आहे. माणगाव नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार हे हाती तुतारी घेणार आहेत. आज मुंबईत यशवंतराव चव्हाण सेंटर येथे होणार शरद पवारांच्या राष्ट्रवादीत त्यांचा प्रवेश होणार आहेत. ज्ञानदेव पवार हे आदिती तटकरे यांच्या विरोधात श्रीवर्धन मधून लढण्याची शक्यता आहे. जागा वाटपात श्रीवर्धन मतदार संघ शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे जाणार असून मंत्री आदिती तटकरे यांच्या विरोधात म्हणजेच सुनिल तटकरे यांना टक्कर देण्यासाठी ज्ञानदेव पवार उभे रहाणार असल्याची माहिती समोर येत आहे.

ज्ञानदेव पवार यांनी यापूर्वी रायगड जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापतीपद भूषवले आहे. . मागील वेळी म्हणजे 2019 मध्ये त्यानी श्रीवर्धनमधून अपक्ष उमेदवार म्हणून विधानसभा निवडणूक देखील लढवली होती.

Marathi Breaking Live Marathi Headlines : महाविकास आघाडीमध्ये रामटेक, दक्षिण नागपूरच्या जागेवरून वाद

महाविकास आघाडीमध्ये रामटेक, दक्षिण नागपूरच्या जागेवरून वाद कायम

मविआच्या बैठकीत उद्धव ठाकरे सेना, काँग्रेस दोन्ही पक्ष रामटेक, दक्षिन नागपूरसाठी आग्रही असल्याने दोन्ही जागांची चर्चा थांबली

आज पुन्हा या दोन्ही जागांवर बैठकीत चर्चा होण्याची शक्यता

कामठी काँग्रेसला तर हिंगणा राष्ट्रवादी शरद पवार गटाला सोडण्यास सहमती

रामटेक, दक्षिण नागपूर ऐवजी राज्यात दुसरीकडे जागा, उबाठाला वाढवून देण्याचा पर्याय काँग्रेसकडून दिला जाणार असल्याची माहिती

दुसरीकडे महायुतीत आशिष जयस्वालला उमेदवारी दिल्यानं माजी आमदार रेड्डी यांनी वेगळी चूल मांडण्याचा तयारीत असल्यानं यात महाविकास आघाडीत दोन्ही पक्ष डोळा ठेवून बसले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com