भारतीय संघ ४३ दिवसांच्या विश्रांतीनंतर मैदानात उतरणार आहे. येत्या १९ सप्टेंबरपासून भारत आणि बांगलादेश या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांच्या मालिकेला प्रारंभ होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना १९ सप्टेंबरपासून चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियमवर रंगणार आहे.
काही दिवसांपूर्वीच मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या संघात एकापेक्षा एक धाकड खेळाडूंना स्थान देण्यात आलंय. त्यामुळे ११ खेळाडूंची निवड करणं नक्कीच रोहितसाठी कठीण असणार आहे.
बांगलादेशविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाचा टॉप आणि मिडल ऑर्डर फिक्स असणार आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल हे दोघेही डावाची सुरुवात करताना दिसून येतील. त्यानंतर शुभमन गिल तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी येईल. विराट कोहली नेहमीप्रमाणे चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना दिसेल. तर केएल राहुल चौथ्या क्रमांकावर खेळताना दिसेल.
रिषभ पंत हा भारतीय संघातील प्रमुख यष्टीरक्षक फलंदाज आहे. मात्र कार अपघात झाल्यानंतर तो बरेच महिने क्रिकेटपासून दूर होता. त्याच्या अनुपस्थितीत, ध्रुव जुरेलला संधी मिळाली. या संधीचं सोनं करत त्याने इंग्लंडविरद्ध झालेल्या मालिकेत शानदार कामगिरी केली. मात्र आता रिषभ पंतचं कमबॅक झालं आहे. त्यामुळे रिषभ पंत की ध्रुव जुरेल? असा पेच रोहित शर्मासमोर असणार आहे.
या मालिकेसाठी आर अश्विन, रविंद्र जडेजा, कुलदीप यादव आणि अक्षर पटेल या चारही गोलंदाजांना संधी देण्यात आली आहे. अश्विन आणि जडेजाला संधी मिळणार, हे जवळजवळ निश्चित आहे. मात्र कुलदीप यादव आणि अक्षर पटेल यांपैकी कोणाला संधी मिळणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
रोहित शर्मा, यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, रिषभ पंत/ध्रुव जुरेल, रविंद्र जडेजा, आर अश्विन, अक्षर पटेल/कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.