gautam gambhir jay shah twitter
Sports

Gautam Gambhir: RCB अन् KKR चे हे शिलेदार होणार टीम इंडियाचे कोच? हेड कोच बनताच गौतम गंभीरची BCCI कडे मागणी

Gautam Gambhir Support Staff: बीसीसीआयने गौतम गंभीरची भारताचा मुख्य प्रशिक्षक म्हणून निवड केली आहे. दरम्यान गोलंदाजी आणि फलंदाजी प्रशिक्षणासाठी गौतम गंभीरने बीसीसीआयकडे शिफारस केली आहे.

Ankush Dhavre

राहुल द्रविड यांचा मुख्यप्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपल्यानंतर गौतम गंभीरची मुख्य प्रशिक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे. मंगळवारी (९ जुलै) बीसीसीआयने याबाबत अधिकृत घोषणा केली आहे. गेल्या काही दिवसांपासून गंभीरच्या नावाची चर्चा होती, मात्र अधिकृतरित्या घोषणा केली नव्हती. आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धा सुरु होण्यापूर्वीच बीसीसीआयने मुख्य प्रशिक्षकाचा शोध घ्यायला सुरुवात केली होती.

दरम्यान मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्विकारण्यापूर्वी गौतम गंभीरने बीसीसीआयसमोर काही अटी ठेवल्या होत्या. त्यापैकीच एक अट म्हणजे, त्याला स्वत:हून फलंदाजी आणि गोलंदाजी प्रशिक्षकाची निवड करायची होती. दरम्यान गौतम गंभीर या पदावर विराजमान होताच, फलंदाजी आणि गोलंदाजी प्रशिक्षकासाठी २ नावं चर्चेत आली आहेत.

आयसीसी वनडे वर्ल्डकप २०२३ नंतर राहुल द्रविड यांचा मुख्यप्रशिक्षकपदाचा कार्यकाळ समाप्त झाला होता. मात्र त्यांना टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेपर्यंत थांबवण्यात आलं होतं. त्यानंतर गौतम गंभीरची मुख्य प्रशिक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे. बीसीसीआयने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट शेअर करत याबाबत अधिकृत घोषणा केली आहे.

कोण होणार फलंदाजी आणि गोलंदाजी प्रशिक्षक ?

रेवस्पोर्ट्जच्या वृत्तात असं म्हटलं गेलं आहे की, यष्टीरक्षण प्रशिक्षक म्हणून टी दिलीप कायम राहू शकतात. तर गौतम गंभीरला फलंदाजी प्रशिक्षक अभिषेक नायर आणि गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून विनय कुमार हवे आहेत.

अभिषेक नायरने आयपीएल २०२४ स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्स संघासाठी फलंदाजी प्रशिक्षकाची भूमिका पार पाडली. त्याला भारतीय संघाकडून ३ वनडे सामने खेळण्याची संधी मिळाली आहे. यासह त्याला आयपीएल स्पर्धेत ६० सामने खेळण्याची संधी मिळाली आहे. तर विनय कुमारबद्दल बोलायचं झालं, तर त्याला भारतीय संघाकडून ४१ सामने खेळण्याची संधी मिळाली आहे. तर आयपीएल स्पर्धेत १०५ सामने खेळण्याची संधी मिळाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vice President Election: सी.पी. राधाकृष्णन कोण आहेत? जाणून घ्या राधाकृष्णन यांचा राजकीय प्रवास

Amol Kolhe :...म्हणून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण होतोय; खासदार अमोल कोल्हेंचा भाजपवर जोरदार प्रहार

Jalna Accident: ट्रकच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर; भीषण अपघातात ३ जणांचा जागीच मृत्यू

Voter Fraud : खोपोलीतही मतदार याद्यांमध्ये घोळ, 140 मतदारांची नावं यादीत दोन वेळा

Makeup Side Effects: दररोज मेकअप केल्याने चेहऱ्यावर काय परिणाम होतो?

SCROLL FOR NEXT