Gautam Gambhir x
Sports

Gautam Gambhir ने अचानक सोडली भारतीय संघाची साथ, तडकाफडकी घेतला मायदेशी परतण्याचा निर्णय; कारण...

Gautam Gambhir News : भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने इंग्लंडहून मायदेशी रवाना होण्याचा निर्णय घेतला आहे. गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका आला आहे. आईची प्रकृती बिघडल्याने भारतीय संघाला माघारी सोडत गंभीर भारतात परतला आहे.

Yash Shirke

Team India : भारतीय क्रिकेट संघ इंग्लंडमध्ये होणाऱ्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी तयारी करत आहे. या दरम्यान एक मोठी बातमी समोर आली आहे. भारतीय संघाचा प्रमुख प्रशिक्षक गौतम गंभीर भारतात परतत आहे. गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका आल्याचे म्हटले जात आहे. त्यांना आयसीयूमध्ये दाखल केल्याने गंभीरने इंग्लंडवरुन मायदेशी परतण्याचा निर्णय घेतला आहे.

गौतम गंभीर ७ जून रोजी भारतीय संघासह लंडनला पोहोचला होता. सध्या भारताचा संघ बेकेनहॅममध्ये सराव करत आहे. आज (१३ जून) संघातील अंतर्गत सराव सामन्यांना सुरुवात होणार आहे. पण त्यापूर्वीच गौतम गंभीरला भारतात परतावे लागणार आहे. २० जूनपासून सुरु होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी तो इंग्लंडमध्ये संघासोबत असेल असे म्हटले जात आहे.

गौतम गंभीरच्या आईचे नाव सीमा गंभीर आहे. त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. मिळालेल्या माहितीनुसार, हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या आयसीयूमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. त्यांची प्रकृती स्थिरावली असून त्या धोक्याबाहेर असल्याची माहिती समोर आली आहे. आईसाठी गंभीर इंग्लंडचा दौरा सोडून मायदेशी परतणार आहे.

तेंडुलकर- अँडरसन ट्रॉफी

भारताचा संघ सध्या इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेची तयारी करत आहे. २० जून रोजी भारत विरुद्ध इंग्लंड या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्याला सुरुवात होणार आहे. युवा कर्णधार शुभमन गिलच्या नेतृत्त्वात पहिल्यांदाच भारताचा संघ मैदानात उतरणार आहे. २० जून ते ४ ऑगस्ट या कालावधीत पाच कसोटी सामने खेळले जाणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mobile Recharge: सरकार भरणार मोबाईलचं बिल? केंद्र सरकारची मोफत रिचार्ज योजना?

हनी ट्रॅपची इनसाईड स्टोरी, हनी ट्रॅपसाठी महिलेने कसा रचला सापळा?

Kolhapur News: 'महादेवी'साठी ग्रामस्थ आक्रमक, वनतारामध्ये 'महादेवी'ला नेण्यास विरोध

EVM Recounting: 8 महिन्यानंतर खडकवासल्यात फेरमतमोजणी, VVPAT मधील व्होटर स्लिप गहाळ ?

Crime News: मुंबईच्या २४ वर्षीय महिलेवर दुबईत सामूहिक बलात्कार; ५ सहकाऱ्यांच्या वासनेची बळी पडली

SCROLL FOR NEXT