Gautam Gambhir Yandex
Sports

Team India Head Coach List: गौतम गंभीर टीम इंडियाचा 25 वा हेड कोच! पाहा संपूर्ण यादी

List Of Head Coach Appointed To Team India: राहुल द्रविडनंतर गौतम गंभीरने भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्विकारली आहे.

Ankush Dhavre

आयसीसी टी-२० वर्ल्डकपनंतर भारतीय संघात मोठे बदल पाहायला मिळाले आहेत. कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली आणि रविंद्र जडेजाने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम केलं आहे. तर मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा मुख्य प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपला आहे. ही जबाबदारी भारतीय संघाचा माजी फलंदाज गौतम गंभीरने स्विकारली आहे. यासह गौतम गंभीर हा भारतीय संघाला प्रशिक्षण देणारा २५ वा प्रशिक्षक ठरला आहे.

गंभीरचा कार्यकाळ हा २०२७ मध्ये होणाऱ्या वनडे वर्ल्डकप स्पर्धेपर्यंत असणार आहे. १९७१ मध्ये केकी तारापोर यांनी पहिल्यांदा भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी स्विकारली होती. तेव्हापासून ते आतापर्यंत कोण कोणत्या दिग्गजांनी भारतीय संघाला प्रशिक्षण दिलं? जाणून घ्या.

इथे पाहा संपूर्ण यादी

१- केकी तारापोर -१९७१ (भारत)

२-हेमू अधिकारी - १९७१-७४ (भारत)

३-गुलाबराय रामचंद्र- १९७५ (भारत)

४-दत्ता गायकवाड - १९७८ (भारत)

५- सलीम दुर्रानी - १९८०-८१ (भारत)

६- अशोक मांकड- १९८२ (भारत)

७- पीआर मान सिंग - १९८३- ८७ (भारत)

८- चंदू बोर्डे- १९८८ (भारत)

९- बिशन सिंग बेदी - १९८९-९१ (भारत)

१०- अब्बास अली बेग - १९९१-९२ (भारत)

११- अजीत वाडेकर- १९९२-९६ (भारत)

१२- संदीप पाटील - १९९६ (भारत)

१३- मदन लाल- १९९६-९७ (भारत)

१४- अंशुमन गायकवाड -१९९७-९९ (भारत)

१५ -कपिल देव - १९९९-२००० (भारत)

१६- जॉन राईट -२०००-०५ (न्यूझीलंड)

१७- ग्रेग चॅपल- २००५-०७ (ऑस्ट्रेलिया)

१८- रवी शास्त्री - २००७ (भारत)

१९- लालचंद राजपूत - २००७-०८ (भारत)

२०- गॅरी कर्स्टन - २००८-११ (दक्षिण आफ्रिका)

२१- डंकन प्लेचर - २०११ -१५ (झिम्बाब्वे)

रवी शास्त्री (टीम मॅनेजर) - २०१४-१६ (भारत)

२२- संजय बांगर - २०१६ (भारत)

२३- रवी शास्त्री - २०१७-२१ (भारत)

२४- राहुल द्रविड - २०२१-२४ (भारत)

२५ - गौतम गंभीर- २०२४ (भारत)

आयसीसी वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धेनंतर राहुल द्रविड यांच्या मुख्य प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपला होता. मात्र रोहित शर्माने राहुल द्रविड यांना थांबण्याची विनंती केली. रोहितच्या विनंतील मान देऊन राहुल द्रविड २०२४ टी-२० वर्ल्डकप स्पर्धेपर्यंत भारतीय संघासोबत थांबले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाने टी-२० वर्ल्डकप स्पर्धेची ट्रॉफी उंचावली. दरम्यान त्यांचा प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपल्यानंतर गौतम गंभीरची मुख्य प्रशिक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Election Commission: निवडणुका स्थगित करा; राज ठाकरे, उद्धव ठाकरेंसह विरोधकांची मागणी, काय आहे कारण?

NCP MLA Sunil Shelke: 'मी जादूटोणा करतो, EVM हॅक करतो', राष्ट्रवादीच्या आमदाराकडून ईव्हीएम वश

Election Commission of India: मतदार यादीत घोळ, आयोगाची वेबसाईट कोण हँडल करतंय? वडेट्टीवारांचा आरोप

Maharashtra Politics: शरद पवार यांना धक्का! पक्षफुटीनंतरही साथ न सोडणाऱ्या निष्ठावंत नेत्याचा तडकाफडकी राजीनामा

Fact Check: दिवाळीत अंबानींकडून 'फ्री गोल्ड'; सोन्याची चेन मोफत देण्याची घोषणा? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय?

SCROLL FOR NEXT