Team India 2026 cricket schedule saam tv
Sports

Team India: T20 वर्ल्ड कपपासून ते न्यूझीलंडची टूर...; 2026 मध्ये टीम इंडियाचं शेड्यूल टाइट, पाहा कधी आणि कोणासोबत खेळणार?

Team India 2026 cricket schedule: २०२६ हे वर्ष भारतीय क्रिकेट टीमसाठी अत्यंत बिझी असणार आहे. वर्षाच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत टीम इंडियाला अनेक महत्त्वाच्या स्पर्धा आणि दौरे खेळायचे आहेत.

Surabhi Jayashree Jagdish

नव्या वर्षाला सुरुवात झालीये. २०२६ हे नवं वर्ष भारतीय क्रिकेट टीमसाठी देखील महत्त्वाचं असणार आहे. भारतीय पुरुष क्रिकेटसाठी हे महत्त्वाचं कारण टी-२० वर्ल्डकपचं आव्हान टीमसमोर आहे. ७ फेब्रुवारी ते ८ मार्च या कालावधीत वर्ल्डकप खेळवला जाणार आहे. २०२४ साली रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने हा वर्ल्डकप जिंकला होता.

आतापर्यंत कोणत्याही टीमने सलग दोन वेळा टी-२० वर्ल्डकपला गवसणी घातलेली नाही. ग्रुप स्टेजमध्ये भारताचे सामने संयुक्त राज्य अमेरिका (USA), नामीबिया, पाकिस्तान आणि नेदरलँड्स यांच्यासोबत होणार आहे.

सूर्यकुमार यादव एक युवा टीम घेईन या स्पर्धेत उतरणार आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी टी20 क्रिकेटपासून दूर राहण्याचा निर्णय घेतलाय. मात्र हे दोन्ही खेळाडू वनडे फॉर्मेटसाठी उपलब्ध असणार आहेत. 2027 वनडे वर्ल्ड कपच्या तयारीत या दोन्ही खेळाडूंची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.

टीम इंडिया या वर्षी श्रीलंका आणि न्यूझीलंड दौऱ्यावरही जाणार आहे. जे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. दरम्यान वर्ल्डकपनंतर टीम इंडियाचे दौरे कसे असणार आहे हे एकदा पाहूयात.

न्यूझीलंडचा भारत दौरा (जानेवारी)

वनडे सामने

  • 11 जानेवारी – पहिली वनडे, वडोदरा

  • 14 जानेवारी – दुसरी वनडे, राजकोट

  • 18 जानेवारी – तिसरी वनडे, इंदौर

टी-२० सामने

  • 21 जानेवारी – पहिली टी20, नागपूर

  • 23 जानेवारी – दुसरी टी20, रायपूर

  • 25 जानेवारी – तिसरी टी20, गुवाहाटी

  • 28 जानेवारी – चौथी टी20, विशाखापट्टणम

  • 31 जानेवारी – पाचवी टी20, तिरुवनंतपुरम

आयसीसी पुरुष टी20 वर्ल्ड कप

7 फेब्रुवारी ते 8 मार्च

यजमान: भारत आणि श्रीलंका

अफगाणिस्तानचा भारत दौरा (जून)

1 टेस्ट

3 वनडे

भारताचा इंग्लंड दौरा (जुलै)

टी-२० सामने

  • 1 जुलै – पहिली टी20, चेस्टर-ले-स्ट्रीट

  • 4 जुलै – दुसरी टी20, मॅन्चेस्टर

  • 7 जुलै – तिसरी टी20, नॉटिंगहॅम

  • 9 जुलै – चौथी टी20, ब्रिस्टल

  • 11 जुलै – पाचवी टी20, साउथॅम्प्टन

वनडे सिरीज

  • 14 जुलै – पहिली वनडे, बर्मिंगहॅम

  • 16 जुलै – दुसरी वनडे, कार्डिफ

  • 19 जुलै – तिसरी वनडे, लॉर्ड्स

भारत-श्रीलंका दौरा (ऑगस्ट)

2 टेस्ट

भारताचा बांगलादेश दौरा (सप्टेंबरमध्ये संभाव्य)

3 वनडे

3 टी20

भारताचा अफगाणिस्तान दौरा, सप्टेंबर-ऑक्टोबर

3 टी20

वेस्ट इंडीजचा भारत दौरा (सप्टेंबर-ऑक्टोबर)

3 वनडे

5 टी20

एशियन गेम्स 2026

यजमान: जपान

भारताचा न्यूझीलंड दौरा (ऑक्टोबर-नोव्हेंबर)

  • 2 टेस्ट

  • 3 वनडे

  • 5 टी20

श्रीलंकेचा भारत दौरा (डिसेंबर)

3 वनडे

3 टी20

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सोलापुरात अर्ज माघारी घेताना गोंधळ

Black Saree Blouse Designs : मकर संक्रांतीला काळ्या साडीवर ट्राय करा 'हे' फॅशनेबल ब्लाउज, सर्वजण तुमच्याकडेच पाहत राहतील

Aagri-Koli Style Mangalsutra Designs: आगरी-कोळी मंगळसूत्राच्या 5 लेटेस्ट डिझाईन्स, लग्नात मिरवण्यासाठी नक्की ट्राय करा

Raigad Accident : प्रवाशांनी खचाखच भरलेल्या बसला ताम्हिणी घाटात अपघात, ५ ते ६ जण गंभीर जखमी

Lipstick for Skin Tone: तुमच्या स्कीन टोननुसार कशी लिपस्टिक निवडाल?

SCROLL FOR NEXT