pakistan cricket team google
Sports

Jasprit Bumrah: 'बुमराह आहे, म्हणून टीम इंडिया...,' माजी खेळाडूचं मोठं वक्तव्य

Jasprit Bumrah Latest News: जसप्रीत बुमराह हा भारतीय संघातील प्रमुख गोलंदाज आहे. त्याचं संघात असणं किती महत्वाचं आहे, हे जगजाहीर आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरही बुमराह भारतीय संघासाठी हुकमी एक्का ठरु शकतो,

Ankush Dhavre

Makhaya Ntini On Jasprit Bumrah:

जसप्रीत बुमराह हा भारतीय संघातील प्रमुख गोलंदाज आहे. त्याचं संघात असणं किती महत्वाचं आहे, हे जगजाहीर आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरही बुमराह भारतीय संघासाठी हुकमी एक्का ठरु शकतो, असं वक्तव्य दक्षिण आफ्रिकेचे माजी गोलंदाज मकाया एंटिनी यांनी केलं आहे. त्यांनी बुमराहचं तोंडभरून कौतुक केलं आहे. (Makhaya Ntini Statement)

भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यात व्यस्त आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं आहे. त्यामुळे जसप्रीत बुमराह पहिल्या दिवशी गोलंदाजी करताना दिसून आला नव्हता. मात्र पाऊस पडला नाही, तर सामन्याच्या दुसऱ्या दिवशी बुमराह गोलंदाजी करताना दिसून येऊ शकतो. (Jasprit Bumrah News)

पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत बोलताना मकाया एंटिनी म्हणाले की,'बघा, बुमराह बॉल कुठून रिलीज करतो. त्याचा हात गोलंदाजी करताना डोक्याच्या वरुन येतो. याच कारणामुळे त्याला बॉल स्टम्पमध्ये आणण्यासाठी अँगल मिळतो. त्याची अॅक्शन नेहमीच एकसारखी असते. हे किती सुंदर आहे ना. बुमराहशिवाय भारतीय संघ इतका मजबूत संघ आहे.' (Latest sports updates)

तसेच ते पुढे म्हणाले की, 'त्याचा यॉर्कर बॉल शानदार आहे. त्याच्या यॉर्करपासून कोणीच वाचू शकत नाही. ही एक अशी गोष्ट आहे,ज्याचा कोणीही आनंद घेऊ शकतो. बुमराहशिवाय भारताचा संघ तो संघ नाही.'

बुमराहबद्दल बोलायचं झालं तर त्याने ३० कसोटी सामन्यांमध्ये २१.९९ च्या सरासरीने १२८ गडी बाद केले आहेत. यादरम्यान त्याने ८ वेळेस ५ गडी बाद करण्याचा कारनामा केला आहे. तर वनडे कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर त्याने ८९ वनडे सामन्यांमध्ये त्याने १४९ आणि ६२ टी-२० सामन्यांमध्ये ७४ गडी बाद केले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

धक्का लागल्याने सटकली; रागाच्या भरात हॉटेलबाहेर धारदार शस्त्राने तरुणाची हत्या, डोंबिवलीत खळबळ

फलटण डॉक्टर मृत्यू प्रकरणी काँग्रेस आक्रमक; उद्या वर्षा बंगल्याला घेरावाचा इशारा|VIDEO

Maharashtra Live News Update : मनोज जरांगेंवर कारवाईची मागणी; धनंजय मुंडेंना ओबीसी कार्यकर्त्यांचा दुग्धाभिषेकाने समर्थन

Couple Kiss in Car : कारमध्ये गर्लफ्रेंडला किस करणं गुन्हा आहे का?

शिरूरमध्ये बिबट्याची दहशत, जीव वाचवण्यासाठी गावकऱ्यांनी लढवली अनोखी शक्कल|VIDEO

SCROLL FOR NEXT