former indian cricketer sunil gavaskar slams virat kohli over his strike rate amd2000 twitter
Sports

Sunil Gavaskar On Virat Kohli: 'आम्हीही थोडं फार क्रिकेट खेळलोय..' विराटच्या त्या वक्तव्यावर सुनील गावस्कर भडकले

Sunil Gavaskar Statement: विराट कोहलीच्या वक्तव्यावर भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर भडकल्याचे पाहायला मिळाले आहे. वाचा काय आहे प्रकरण.

Ankush Dhavre

भारतीय संघाचे माजी खेळाडू सुनील गावस्कर सध्या स्टार स्पोर्ट्ससाठी क्रिकेट एक्सपर्टची भुमिका पार पाडत आहेत. आयपीएल २०२४ स्पर्धेत शनिवारी झालेल्या सामन्यात गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. या सामन्यादरम्यान सुनील गावस्कर यांनी स्टार स्पोर्ट्सवर हल्लाबोल केल्याचे पाहायला मिळाले आहे. याचं निमित्त विराट कोहली ठरला आहे.

विराटने नुकताच आपल्या स्ट्राईक रेटबाबत वक्तव्य केलं होतं. तो म्हणाला होता की, जे लोक माझ्या स्ट्राईक रेटबाबत चर्चा करत आहेत त्यांची मला पर्वा नाही. मी बाहेरच्या गोष्टींकडे लक्ष देत नाही. विराटच्या या वक्तव्यावरुन सुनील गावस्कर यांनी जोरदार टीका केल्याचे पाहायला मिळाले आहे.

नेमकं काय घडलं?

गेल्या आठवड्यात गुजरात टायटन्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात विराट कोहलीने ४४ चेंडूंचा सामना करत ७० धावांची खेळी केली होती. या खेळीनंतर त्याने टीका करणाऱ्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं होतं. या सामन्यात त्याने फिरकी गोलंदाजांविरुद्ध खेळताना १७९ च्या सरासरीने ६१ धावा केल्या. त्यावेळी विराट म्हणाला होता की,' जे लोकं माझ्या स्ट्राईक रेटबद्दल आणि फिरकी गोलंदाजांविरुद्ध खेळताना माझ्या स्ट्राईक रेटबद्दल चर्चा करतात, माझ्यासाठी संघाला विजय मिळवून देणं महत्वाचं आहे. १५ वर्षांपासून मी हेच करतोय आणि संघाला सामने जिंकूनही दिले आहेत. मला वाटत की, जे मैदानावर नसतात त्यांनी कॉमेंट्री बॉक्समध्ये बसून अशा चर्चा करायला नको. मला वाटतं की, जे लोकं मैदानावर खेळत आहेत आणि याआधी खेळले आहेत त्यांना माहित आहे की, हे नक्की काय आहे.'

विराट कोहलीची ही मुलाखत स्टार स्पोर्ट्सवर अनेकदा दाखवण्यात आली आहे. यावर बोलताना सुनील गावस्कर म्हणाले की, 'सामन्यानंतर झालेली ती मुलाखत याआधीही दाखवण्यत आली आहे. ही मुलाखत कितीतरी वेळा दाखवण्यात आली आहे. मला खात्री आहे की, स्टार स्पोर्ट्सला ही बाब कळेल की, टीका करणारे समालोचक आहेत. स्टार स्पोर्ट्सचे समालोचकच आहेत ज्यांना सातत्याने प्रश्न विचारले जात आहेत.'

तसेच ते पुढे ते म्हणाले की, ' सलामीला येऊन ११८ च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करणं आणि १४ व्या १५ व्या षटकात बाद होऊनही स्ट्राईक रेट ११८ चा असतो. जर या कामगिरीवर तुम्हाला कौतुकाची थाप हवी असेल, तर हे आश्चर्यचकीत करणारं आहे. एखादा व्यक्ती स्टार स्पोर्ट्सच्या समालोचकांना कमीपणा दाखवतोय आणि स्टार स्पोर्ट्स तीच गोष्ट सातत्याने दाखवतंय. आम्ही देखील जास्त नाही, पण थोडंफार क्रिकेट खेळलोय. आम्हाला जे दिसतंय,त्याबद्दलच बोलतो. यात आमची आवडनिवड नसते. आवडनिवड असेलही पण आम्ही वास्तवात होतंय त्याबद्दलच बोलतो.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : अवघे गरजे पंढरपूर…! मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

SCROLL FOR NEXT