Sunil Gavaskar On Harshit Rana: 'हे चुकीचं आहे' प्लाइंग किस सेलिब्रेशन करणाऱ्या गोलंदाजावर सुनील गावस्कर भडकले

Harshit Rana Flying Kiss Celebration: आयपीएल २०२४ स्पर्धेतील तिसऱ्या सामन्यात हर्षित राणा हा कोलकाता नाईट रायडर्स संघाच्या विजयाचा हिरो ठरला. मात्र एका कृत्यामुळे तो ट्रोल झाला आहे.
ipl 2024 kkr vs srh sunil gavaskar gets angry on harshit rana flying kiss celebration after taking wicket of mayank agarwal amd2000
ipl 2024 kkr vs srh sunil gavaskar gets angry on harshit rana flying kiss celebration after taking wicket of mayank agarwal amd2000twitter
Published On

Sunil Gavaskar Statement On Harshit Rana:

आयपीएल २०२४ स्पर्धेतील तिसऱ्या सामन्यात हर्षित राणा हा कोलकाता नाईट रायडर्स संघाच्या विजयाचा हिरो ठरला. मात्र एका कृत्यामुळे तो ट्रोल झाला आहे. धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या सनरायझर्स हैदराबाद संघाकडून मयांक अगरवालने चांगली सुरुवात करून दिली. मात्र हर्षित राणाने टाकलेल्या बाऊन्सर चेंडूवर त्याला बाद होऊन माघारी परतावं लागलं आहे. दरम्यान बाद होऊन माघारी जात असताना हर्षित राणा त्याला डिवचताना दिसून आला.

मयांक अगरवालला बाद करण्यासाठी रिंकू सिंगने शानदार झेल टिपला. दरम्यान झेल टिपल्यानंतर गोलंदाज हर्षित राणाने मयांक अगरवालला फ्लाइंग किस दिली. दरम्यान रागात असलेला मयांक अगरवाल त्याला डोळे दाखवत मैदानाच्या बाहेर गेला. हे माजी भारतीय क्रिकेटपटू सुनील गावसकर यांना आवडलेलं नाही.

ipl 2024 kkr vs srh sunil gavaskar gets angry on harshit rana flying kiss celebration after taking wicket of mayank agarwal amd2000
Pat Cummins Statement: 'आम्ही असा विचार केला नव्हता...'हातचा सामना निसटल्यानंतर काय म्हणाला पॅट कमिन्स?

अनुभवी फलंदाज मयांक अगरवालला बाद केल्यानंतर हर्षित राणाने फ्लाइंग किस सेलिब्रेशन केलं. हे सेलिब्रेशन पाहून सुनील गावस्कर म्हणाले की, ' त्याने हे नव्हतं करायचं. तो षटकारांचा पाऊस पाडत होता का? या गोष्टी न करताही क्रिकेट खेळता येऊ शकतं. हे टेलिव्हिजनचं युग आहे. तुम्ही आपल्या सहकाऱ्यांसोबत सेलिब्रेशन करावं. मात्र विरोधी संघातील खेळाडूसोबत असं करणं चुकीचं आहे. (Cricket news in marathi)

ipl 2024 kkr vs srh sunil gavaskar gets angry on harshit rana flying kiss celebration after taking wicket of mayank agarwal amd2000
KKR VS SRH Last Over: २ चेंडूत ५ धावांची गरज अन् एका कॅचमुळे फिरली मॅच! शेवटच्या षटकात नेमकं काय घडलं?

तसेच या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, सनरायझर्स हैदराबाद संघाला हा सामना जिंकण्यासाठी शेवटच्या २ चेंडूवर ५ धावांची गरज होती. मात्र हे आव्हान हैदराबादचा संघ पूर्ण करू शकला नाही. शेवटच्या षटकात १३ धावांची गरज असताना हर्षित राणाने २ फलंदाजांना बाद करत ८ धावा खर्च केल्या आणि संघाला विजय मिळवून दिला. हा कोलकाता नाईट रायडर्स संघाचा या हंगामातील पहिलाच विजय आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com