भारताचा माजी क्रिकेटपटू आणि प्रसिद्ध समालोचक आकाश चोप्रा आपल्या रोखठोक वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असतो. नुकताच त्याने आयपीएल स्पर्धेत भारतीय खेळाडूंना मिळणाऱ्या मानधनावरुन नाराजी व्यक्त केली आहे.
त्याचं म्हणणं आहे की, भारताचे स्टार खेळाडू विराट कोहली, जसप्रीत बुमराह,रोहित शर्मा आणि मोहम्मज शमी यांना परदेशी खेळाडूंपेक्षा अधिक मानधन मिळायला हवं.
आयपीएल २०२४ स्पर्धा सुरु व्हायला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. या स्पर्धेसाठीचा लिलाव १९ डिसेंबर रोजी दुबईत पार पडला. या लिलावात अनेक असे खेळाडू ज्यांच्यावर १० कोटींपेक्षाही अधिकची बोली लागली.
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सवर २०.५० लाखांची बोली लागली. तो या स्पर्धेत २० कोटींपेक्षा अधिकची बोली लागणारा पहिलाच,तर काही मिनिटांसाठी स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला. मात्र अवघ्या काही मिनिटातच मिचेल स्टार्कवर २४.७५ कोटींची बोली लागली. स्टार्क या स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. (Latest sports updates)
आपल्या युट्यूब चॅनेलवर बोलताना आकाश चोप्रा म्हणाला की,' ही इंडियन प्रीमियर लीग आहे. एका खेळाडूला इतके कमी आणि एका खेळाडूला इतके जास्त पैसे मिळताय? जर काल जसप्रीत बुमराह म्हणाला असता की मला रिलीज करा मला ऑक्शनमध्ये जायचं आहे. किंवा विराट कोहली हे आरसीबीला म्हणाला असता, तर त्यांची किंमत वाढली असती ना? हे असंच व्हायला हवं.'
तसेच तो पुढे म्हणाला की,' जर ऑक्शनमध्ये स्टार्कवर २५ कोटींची बोली लागत असेल, तर विराटची किंमत ४२ कोटी रुपये असायला हवी. तर बुमराहची किंमत ३५ कोटी रुपये असायला हवी. जर विराट कोहली ऑक्शनमध्ये आला असता तर त्याची किंमत ४२ कोटी रुपये इतकी असती. जर हे होत नसेल तर नक्कीच काहीतरी चुकतंय. यावर एकच उपाय आहे, परदेशी खेळाडूंवर बोली लावताना मर्यादा असायला हवी.'
याचं उदाहरण देत तो म्हणाला की,'जर तुमच्याकडे २०० कोटी रुपये असतील, १.५ किंवा १.७५ कोटी रुपये भारतीय खेळाडूंसाठी असायला हवे, तर उर्वरित रक्कम ही परदेशी खेळाडूंसाठी असायला हवी, तेव्हा योग्य न्याय होईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.