Diogo Jota Death x
Sports

Footballer Death : कार अपघातात प्रसिद्ध फुटबॉलपटूचा मृत्यू, १० दिवसांपूर्वीच झालं होतं लग्न

Diogo Jota Death : लिव्हरपूलकडून क्लब फुटबॉल खेळणारा पोर्तुगालचा २८ वर्षीय फुटबॉलपटू डियोगो जोटाचा मृत्यू झाला आहे. कार अपघातात डियोगो जोटा आणि त्याचा भाऊ आंद्रे सिल्वा या दोघांचे निधन झाले आहे.

Yash Shirke

Diogo Jota : क्रिडाविश्वातून दु:खद बातमी समोर आली आहे. लिव्हरपूलकडून खेळणारा पोर्तुगालचा फुटबॉलपटू डियोगो जोटाचे कार अपघातात निधन झाले आहे. अवघ्या १० दिवसांपूर्वी त्याचे लग्न झाले होते. या अपघातात डियोगो जोटाच्या भावाचा देखील मृत्यू झाल्याचे म्हटले जात आहे. पोर्तुगाल फुटबॉल फेडरेशनने सोशल मीडियावर अपघातासंबंधित माहिती देत डियोगो जोटाला श्रद्धांजली वाहिली आहे. स्पेनमधील झमोरा येथे डियोगो जोटाचे निधन झाले आहे.

'आज (३ जुलै) सकाळी स्पेनमध्ये डियोगो जोटा आणि त्याचा भाऊ आंद्रे सिल्वा यांचे कार अपघातात निधन झाले. पोर्तुगाल फुटबॉल फेडरेशन आणि पोर्तुगीज फुटबॉल संघाच्या चाहत्यांना या घटनेमुळे धक्का बसला आहे', असे ट्वीट पोर्तुर्गाल फुटबॉल फेडरेशनने केले आहे. २८ वर्षीय डियोगो जोटाने पोर्तुगालसाठी ४९ आंतरराष्ट्रीय सामने खेळला होता.

डियोगो जोटाचा जन्म ४ डिसेंबर १९९६ रोजी पोर्ता, पोर्तुगाल येथे झाला होता. २०१४ मध्ये त्याने पोर्तुगालच्या अंडर-१९ संघात स्थान मिळवले होते. पाच वर्षानंतर तो राष्ट्रीय संघात सामील झाला. त्याने एकूण ४९ आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सहभाग घेतला होता. यामध्ये त्याने एकूण १४ गोल केले आहोत. २०२० मध्ये डियोगो जोटाने लिव्हरपूलमध्ये प्रवेश केला होता. या क्लबकडून त्याने १२३ सामने खेळले. यात त्याने ४७ गोल केले. तो फॉरवर्ड, लेफ्ट विंगर पोझिशनमध्ये खेळायचा.

डियोगो जोटाने रुटे कार्डोसोशी २२ जून २०२५ रोजी लग्न केले होते. अनेक वर्षांपासून ते दोघे रिलेशनशिपमध्ये होते. बुधवारी त्याच्या पत्नीने, रुटे कार्डोसोने त्यांच्या लग्नाचा व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये डियोगो जोटा, रुटे कार्डोसो आणि त्यांची ३ मुलं आहेत. डियोगो जोटाच्या निधनामुळे क्रिडा विश्वात हळहळ व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mangal Gochar 2025: सप्टेंबर महिन्यात पालटणार 'या' राशींचं नशीब; मंगळाच्या गोचरने होणार लाभ

Maharashtra Live News Update: संगमेश्वर माखजन बाजारपेठेला पुन्हा एकदा पुराचा धोका

Ganeshotsav 2025: यंदा गणेशोत्सव कधी आहे? जाणून घ्या तारीख

Khopoli Ghat Traffic : खोपोली घाटात १०० हून अधिक कार थांबल्या, जाणून घ्या धक्कादायक कारण

Mobile Deals: ३००० पेक्षा कमी किंमतीत मोबाईल फोन, YouTube आणि JioHostar पाहण्याची देखील सुविधा

SCROLL FOR NEXT