Holiday : ७ जुलैला मिळणार सार्वजनिक सुट्टी! शाळा, बँका, बाजार… काय बंद राहणार?

Public Holiday : 7 जुलैला सार्वजनिक सुट्टी मिळणार आहे... मात्र ही सुट्टी नेमकी कशासाठी? यादिवशी नेमक्या कोणत्या सेवा सुरु राहणार आणि कोणत्या सेवा बंद राहणार? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...
Public Holiday
Public HolidaySaam Tv
Published On

मोहरम हा इस्लामिक कॅलेंडरचा पहिला महिना असून तो इस्लामिक नवीन वर्षाची सुरुवात मानला जातो. इस्लामिक कॅलेंडर चंद्र आधारित असल्यानं मोहरमची तारीखही चंद्रदर्शनावर ठरत असते. त्यामुळे दर वर्षी मोहरमच्या तारखेत बदल पाहायला मिळतो. या वर्षी भारतात मोहरमची तारीख 6 जुलै आहे. पण चंद्र एक दिवस उशीरा दिसला तर एक दिवस पुढे म्हणजे 7 जुलैपासूनही मोहर्रमची सुरवात होऊ शकते. यामुळेच देशातील विविध राज्यांमध्ये मोहरमची सुट्टी वेगवगेळी असू शकते. त्यामुळे नागरिकांनी स्थानिक प्रशासन तसेच विद्यार्थ्यांनी शाळेच्या नोटीसकडे लक्ष द्यावे. त्यामुळे देशभरात कोणत्या सेवा बंद राहतील आणि कोणत्या सुरु राहतील? पाहूयात...

सुट्टीच्या दिवशी काय बंद राहणार?

- शाळा-महाविद्यालय आणि विद्यापीठ बंद राहणार

- सरकारी कार्यालय आणि बँका बंद असणार

- ऑनलाइन बँकिंग सेवा आणि डिजिटल व्यवहार सुरू

- कॉर्पोरेटमध्ये विशेष रजा किंवा रजेचा पर्याय दिला जाऊ शकतो

- वाहतूक आणि इतर अत्यावश्यक सेवा सुरु राहणार

- मोहरमला शेअर बाजाराला सुट्टी नाही

- 6 जुलैला रविवार असल्यानं शेअर बाजार नेहमीप्रमाणे बंद

Public Holiday
Viral : समुद्रात सापडली भगवान विष्णूची मूर्ती? 5 हजार वर्षे जुनी मूर्ती पाहण्यासाठी भक्तांची प्रचंड गर्दी?

मुळात भारत सरकारने मोहरमनिमित्त राष्ट्रीय सार्वजनिक सुट्टी म्हणून घोषित केली असली तरी चंद्र दर्शनानुसारच राज्य सरकार सुट्टी लागू करण्याबाबत निर्णय घेईल...

Public Holiday
Rishabh Pant : तोच बॉलर, तोच फिल्डर अन् तीच चूक! रिषभ पंत पुन्हा इंग्लंडच्या जाळ्यात अडकला; रागात हॅल्मेट खाली फेकणार इतक्यात...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com