Rishabh Pant : तोच बॉलर, तोच फिल्डर अन् तीच चूक! रिषभ पंत पुन्हा इंग्लंडच्या जाळ्यात अडकला; रागात हॅल्मेट खाली फेकणार इतक्यात...

Ind Vs Eng : भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेतील दुसरा सामना बर्मिंगहॅममध्ये सुरु आहे. या सामन्यामध्ये भारताच्या लागोपाठ विकेट पडत आहेत. रिषभ पंत फक्त २५ धावांवर बाद झाला आहे.
Rishabh Pant
Rishabh Pantx
Published On

Ind Vs Eng 2nd Test : भारत विरुद्ध इंग्लंड सामना सध्या बर्मिंगहॅममधील एजबॅस्टन स्टेडियमवर सुरु आहे. या सामन्यामध्ये रिषभ पंत फक्त २५ धावा करुन माघारी परतला आहे. पहिल्या कसोटी सामन्यामध्ये केलेल्या चुकीची पुनरावृत्ती केल्याने रिषभ पंत बाद झाला आहे. आता भारताचा निम्मा संघ तंबूत परतला आहे.

Rishabh Pant
Ind Vs Eng : प्रसिद्ध क्रिकेटपटूचे निधन, भारत-इंग्लंड सामन्यादरम्यान खेळाडूंनी वाहिली श्रद्धांजली

नेमकं काय घडलं?

६० व्या ओव्हरमध्ये शोएब बशीर गोलंदाजीसाठी आला. त्यावेळेस रिषभ पंत हा स्ट्राईकवर होता. तेव्हा ओव्हरच्या पहिल्याच चेंडूवर रिषभने मोठा शॉट मारण्याचा प्रयत्न केला. शॉट खेळल्यानंतर चेंडूवर गेला. डिप मिड विकेटला उभा असलेल्या झॅक क्रॉलीने धावत चेंडू झेलत रिषभ पंतला बाद केले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे पहिल्या सामन्याच्या दुसऱ्या डावात अशात प्रकारे रिषभ पंत बाद झाला होता. एका प्रकारे, बेन स्टोक्स आणि शोएब बशीरच्या जाळ्यात रिषभ पंत अडकला आणि बाद होऊन माघारी परतला. बाद झाल्यानंतर रिषभ स्वत:वरच रागावला. डगआउटमध्ये पोहोचल्यानंतर त्याने डोक्यावरील हेल्मेट काढले. तो हेल्मेट रागात खाली टाकणार होता, पण त्याने तसे केले नाही.

रिषभ पंतच्या विकेटनंतर लगेचच नितीश कुमार रेड्डी फलंदाजी करण्यासाठी आला. ६१ व्या ओव्हरमध्ये ख्रिस वोक्सने नितीशला बाद केले. नितीशने फक्त १ धाव केली होती. आतापर्यंत (६५ व्या ओव्हरपर्यंत) भारताने पाच गडी गमावले आहेत. सध्या शुभमन गिल आणि रवींद्र जडेजा फलंदाजी करत आहेत. या दोघांवर भारताला जास्तीत जास्त धावा करुन देण्याची जबाबदारी आहे.

Rishabh Pant
Yashasvi Jaiswal : इंग्लंडमध्ये इतिहास रचण्यात जैस्वाल अ'यशस्वी'! थोडक्यात शतक हुकलं, टुकार चेंडूवर फेकली विकेट

इंग्लडने भारताला फलंदाजी करण्याचे आमंत्रण दिले. त्यानंतर यशस्वी जैस्वाल आणि केएल राहुल ही सलामीची जोडी मैदानात उतरली. राहुल २ धावांवर बाद झाला. त्यानंतर तिसऱ्या क्रमावर आलेल्या करुण नायरने ३१ धावा केल्या. यशस्वी जैस्वालचे शतक अवघ्या १३ धावांनी हुकले. शुभमन गिल आणि रिषभ पंत यांनी खेळ पुढे नेण्याचा प्रयत्न केला. पण तेवढ्यात रिषभ पंतची विकेट पडली.

Rishabh Pant
Ind Vs Eng सामन्यात जोरदार राडा, यशस्वी जैस्वाल थेट कॅप्टनलाच भिडला; पाहा Viral Video

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com