Ind Vs Eng सामन्यात जोरदार राडा, यशस्वी जैस्वाल थेट कॅप्टनलाच भिडला; पाहा Viral Video
Ind Vs Eng 2nd Test : बर्मिंगहॅमच्या एजबॅस्टन स्टेडियमवर भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेतील दुसरा सामना सुरु आहे. या सामन्यामध्ये इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने टॉस जिंकला आणि भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करण्याचे आमंत्रण दिले. पहिल्या दिवसाच्या पहिल्या सत्रात २ विकेट्स गमावत भारताने ९८ धावा केल्या.
दुसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान भारताचा युवा सलामीवीर यशस्वी जैस्वाल आणि इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स यांच्यामध्ये बाचाबाची झाल्याचे पाहायला मिळाले. पहिल्या डावात १७ व्या ओव्हरमध्ये गोलंदाजी करण्यासाठी बेन स्टोक्स आला. ओव्हरच्या चौथ्या चेंडूवर यशस्वी जैस्वालने चौकार मारला. चौकार मारल्यानंतर स्टोक्स आणि जैस्वाल यांच्यात राडा झाल्याचे पाहायला मिळाले. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
यशस्वी जैस्वाल आणि बेन स्टोक्स हे दोघेही एकमेकांना डोळे वटारुन पाहत असल्याचे पाहायला मिळाले. त्यांच्यामध्ये शाब्दिक चकमक देखील झाली. त्यानंतर स्टोक्स रनअप घेण्यासाठी गेला. यादरम्यान इंग्लंडचा कर्णधार युवा सलामीवीराल स्लेज करण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसले. पण यशस्वी जैस्वालने स्लेजिंगकडे लक्ष न देता खेळावर लक्ष केंद्रित केले.
पहिल्या दिवसाच्या पहिल्या डावात भारतीय संघाने ९८ धावा केल्या. यात डावात यशस्वी जैस्वाल चमकला, त्याने अर्धशतकीय खेळी केली. शतकापर्यंत पोहोचण्याची त्याची वाटचाल सुरु आहे. केएल राहुल फक्त २ धावा करुन माघारी परतला. ३१ धावांवर करुण नायरची विकेट पडली. दोन विकेट गमावल्यानंतर कर्णधार शुभमन गिल आणि यशस्वी जैस्वाल यांनी खेळ सावरला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.