indian hokcey team  google
Sports

Hockey World Cup 2024: मोठी बातमी! हॉकी वर्ल्डकपसाठी भारतीय पुरुष अन् महिला संघाची घोषणा; असे आहेत दोन्ही संघ

Team India Squad For Hockey World Cup 2024: हॉकी इंडियाने आगामी हॉकी वर्ल्डकप स्पर्धेसाठी भारतीय पुरुष आणि महिला संघाची घोषणा केली आहे. महिलांच्या स्पर्धेचे आयोजन २४ ते २७ जानेवारी दरम्यान केले जाणार आहे.

Ankush Dhavre

Team India Squads For Hockey World Cup 2024:

हॉकी इंडियाने आगामी हॉकी वर्ल्डकप स्पर्धेसाठी भारतीय पुरुष आणि महिला संघाची घोषणा केली आहे. महिलांच्या स्पर्धेचे आयोजन २४ ते २७ जानेवारी दरम्यान केले जाणार आहे. तर पुरुषांची स्पर्धा २८ जानेवारी ते ३१ जानेवारी दरम्यान खेळली जाणार आहे.

महिला संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी अनुभवी गोलकिपर रजनीकडे असणार आहे. तर डिफेंडर महिला चौधरी उपकर्णधाराच्या भूमिकेत असणार आहे. तर पुरुष संघाची जबाबदारी सिमरनजीत सिंग आणि उपकर्णधारपदाची जबाबदारी मनदीप मोरकडे असणार आहे.

महिलांच्या संघात या खेळाडूंना मिळालं स्थान

कर्णधार रजनीसह बंसारी सोलंकी ही गोलकिपरच्या भूमिकेत असणार आहे. अक्षता अबासो ढेकाले आणि ज्योती छत्री डिफेंडरच्या भूमिकेत असणार आहे. मिडफिल्डरसाठी मारियाना कुजूर आणि मुमताज खानला संघात स्थान दिलं गेलं आहे.

तर अजमीना कुजूर, रुताजा दादासो पिसल आणि दीपिका सोरेंग हे फॉरवर्डच्या भूमिकेत खेळताना दिसतील. भारतीय संघ पुल सी मध्ये असून,नामीबिया, पोलँ आणि अमेरिकेसोबत दोन हात करताना दिसून येईल. (Latest sports updates)

पुरुषांच्या संघात या खेळाडूंना मिळालं स्थान..

सिमरनजीत सिंगच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघात गोलकिपर म्हणून सूरज करकेरा आणि प्रशांत कुमार चौहान यांना स्थान दिलं आहे. तर डिफेंसची जबाबदारी मनजीत आणि मनजीत मोरच्या हाती सोपवण्यात आली आहे.

मोहम्मद राहिल मौसीन आणि मनिंदर सिंग हे मिडफिल्ड पोझिशनवर खेळताना दिसून येतील. कर्णधार सिमरनजीत सिंग, पवन राजभर, गुरजोत सिंग आणि उत्तम सिंग हे फॉरवर्डच्या भूमिकेत खेळताना दिसून येतील.

भारतीय पुरुषांचा संघ पूल बी मध्ये आहे. भारतीय संघाचे सामने मिस्त्र,जमायका आणि स्वित्झरलँड या संघासोबत रंगणार आहे. पूल ए मध्ये नायजेरिया, नेदरलँड, पाकिस्तान आणि पोलँडचा संघ आहे. तर सी मध्ये ऑस्ट्रेलिया केनिया, न्यूझीलंड, त्रिनिदाद आणि टोबॅगो यांचा समावेश आहे. पूल डीमध्ये फिजी, मलेशिया,ओमान आणि अमेरिकेचा संघ आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

एक कॅप्सूल, पाण्याचं पेट्रोल? पेट्रोलसाठी पंपावर जाण्याची गरज नाही?

Maharashtra Politics: माणिकराव कोकाटेंचं काय होणार? कोकाटे वादाच्या चक्रव्युहात?

Maharashtra Live News Update: वाशिम शहरातील गणेश पेठ येथे घराला अचानक आग

ईश्वरपुरात बलात्कारी राक्षस, सामुहिक अत्याचारानंतर नग्न धिंड

एकनाथ शिंदेंचा राज ठाकरेंना जबरा धक्का! ऐन निवडणुकीत मनसेच्या प्रमुख शिलेदारांसह शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेना प्रवेश

SCROLL FOR NEXT