Women's Hockey Asian Champions Trophy: भारतीय नारी सब पे भारी! जपानला ४-० ने लोळवत महिला एशियन चॅम्पियन्स ट्रॉफीवर दुसऱ्यांदा कोरलं नाव

Indian Women's Hockey Team News: या सामन्यात भारतीय महिला संघाने जपानवर विजय मिळवला आहे.
Women's Hockey Asian Champions Trophy
Women's Hockey Asian Champions TrophyX/The hockey india
Published On

Women's Hockey Asian Champions Trophy India vs Japan Final:

भारतीय महिला हॉकी संघाने रविवारी एशियन चॅम्पियन्स ट्रॉफीचा खिताब पटकावला आहे. स्पर्धेतील अंतिम सामन्यात भारतीय महिला संघाने जपानवर ४-० ने विजय मिळवला आहे. भारतीय महिला संघाने दुसऱ्यांदा हा कारनामा करुन दाखवला आहे.

भारतीय संघाकडून संगीताने १७ व्या मिनिटाला, नेहाने ४६ व्या मिनिटाला लालरेमसियामीने ५७ व्या मिनिटाला आणि वंदना कटारियाने ६० व्या मिनिटाला गोल केला. भारतीय संघाच्या ४-० च्या आघाडीसमोर प्रत्युत्तरात जपानकडून कुठल्याही खेळाडूला गोल करता आला नाही.

भारतीय महिला संघाकडून संगीता आणि वंदना थेट गोल केला. तर लालरेमसियामीने आणि नेहाने पेनल्टी कॉर्नरवरुन गोल केला. (Latest sports updates)

हा सामना रांचीतील मारंग गोमके जयपाल सिंग एस्ट्रोहर्ट हॉकी स्टेडियममध्ये हा रोमांचक सामना पार पडला. या अंतिम सामन्यात विजय मिळवाताच हॉकी इंडियाने ट्वीट करत मोठी घोषणा केली आहे.

Women's Hockey Asian Champions Trophy
IND vs SA: 'आम्हाला आधीच माहीत होतं...', लाजीरवाण्या पराभवानंतर टेम्बा बावुमाच्या प्रतिक्रियेने वेधलं लक्ष

विजेत्या संघातील प्रत्येक खेळाडूला प्रत्येकी ३-३ लाख रुपये दिले जाणार आहेत. तर सपोर्ट स्टाफमधील सदस्यांना प्रत्येकी १.५ लाख रुपये दिले जाणार आहेत.

जपान संघाकडून कोबायाकावाने गोल केला होता. मात्र व्हिडिओमध्ये पाहिल्यानंतर हा गोल रद्द करण्यात आला. जपानला या सामन्यातील ५२ व्या सामन्यात पेनल्टी स्ट्रोक देखील मिळाला होता. मात्र जपानच्या खेळाडूने खेळलेला शॉट भारतीय गोलकिपर सविता पुनियाने रोखला.

Women's Hockey Asian Champions Trophy
Virat Kohli Century: किंग कोहलीने घडवला इतिहास! वाढदिवशीच सचिनच्या शतकांच्या रेकॉर्डशी बरोबरी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com