FIH Pro League Hockey: टीम इंडियानं काढला जर्मनीचा वचपा; आता इंग्लंडविरुद्ध लढत

टीम इंडियाचे पुढील दोन सामने इंग्लंडविरुद्ध आहेत. येत्या दाेन आणि तीन एप्रिलला भुवनेश्वर येथेच हे सामने होणार आहेत.
FIH Pro League Hockey News
FIH Pro League Hockey NewsSaam Tv
Published On

भुवनेश्वर : भुवनेश्वर येथे सुरु असलेल्या प्रो लीग हाॅकी (FIH Pro League Hockey) सामन्यात शनिवारी जर्मनी (Germany) संघाने भारतीय संघास (Indian Women's Hockey Team) नमविले हाेते. त्याचा वचपा भारतीय संघाने (india) रविवारी ३-० असा जर्मनीचा पराभव करुन काढला. (sports latest marathi news)

या स्पर्धेत भारत आणि जर्मनी यांच्यात या दोन्ही प्रो लीगचे सामने चुरशीचे झाले. दोन्ही वेळा शूटआऊटमध्ये सामन्याचा फैसला झाला. भुवनेश्वरमधील कलिंगा स्टेडियमवर शनिवारी पहिल्या टप्प्यात भारतीय संघाचा शूट-आऊटमध्ये १-२ असा पराभव झाला. यामुळे रविवारच्या सामन्यात टीम इंडियाला पुनरागमन करणे आवश्यक होते. सविता राणीच्या (Savita Rani) नेतृत्वाखालील भारतीय संघाने क्रीडाप्रेमींची (Sports) निराश केली नाही. दुस-या टप्प्यात संपूर्ण ६० मिनिटांत दोन्ही संघांचे समान गुण झाले. निर्धारित वेळेनंतर स्कोअरलाइन १-१ अशी होती. त्यामुळे शूट आऊटवर सामना गेला.

FIH Pro League Hockey News
Navi Mumbai: नवी मुंबई महापालिका शाळेत पेन नव्हे तर विद्यार्थ्यांच्या हाती दिला झाडू

खरंतर प्रथमच प्रो लीगमध्ये खेळणाऱ्या भारतीय संघाला दुसऱ्या टप्प्यातही चांगली सुरुवात करता आली नाही. फेलिसिया विडरमनने (Felicia Weidermann) २९ व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर गोल करून जर्मनीला आघाडी मिळवून दिली. तिसऱ्या क्वार्टरपर्यंत जर्मनी १-० ने आघाडीवर होती. भारताच्या निशाने ४० व्या मिनिटाला गोल करून संघास १-१ अशी बरोबरी साधून दिली.

जागतिक क्रमवारीत नवव्या क्रमांकावर असलेल्या भारताची पेनल्टी कॉर्नरवर पुन्हा एकदा निराशा झाली. संघाला तीनपैकी एका पेनल्टी कॉर्नरवर गोल करता आला नाही तर जर्मनीने पाचपैकी एका पेनल्टी कॉर्नरवर गोल केला.

FIH Pro League Hockey News
Cristiano Ronaldo Hat-Trick: फुटबॉलमधील जागतिक विक्रम क्रिस्टियानो रोनाल्डोनं मोडला

सविता ठरली चॅम्प

यानंतर सामना शूटआऊटपर्यंत पोहोचला. संगीता कुमारी, सलीमा आणि सोनिका यांनी पहिल्या तीन प्रयत्नात भारतासाठी गोल केले. दुसरीकडे, जर्मनीच्या संघाला पहिल्या तीन प्रयत्नांत भारतीय गोलरक्षक सविताचा पराभव करण्यात अपयश आले. जर्मनीच्या लिली स्टोफेल्स्मा, लीना फ्रीच्स आणि साराह स्ट्रॉस यांनी तीन प्रयत्न केले, परंतु कोणीही त्याचे गोलमध्ये रूपांतर करू शकले नाहीत.

भारताने गुणतालिकेत घेतली झेप

या विजयासह भारताला बोनस गुणासह दोन गुण मिळाले तर जर्मनीला एक गुण मिळाला. या विजयासह भारत FIH प्रो लीगमध्ये दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. भारताचे सहा सामन्यांत १२ गुण आहेत. अर्जेंटिना चार सामन्यांत १२ गुणांसह आघाडीवर आहे. टीम इंडियाचे पुढील दोन सामने इंग्लंडविरुद्ध आहेत. येत्या दाेन आणि तीन एप्रिलला भुवनेश्वर येथेच हे सामने होणार आहेत.

Edited By : Siddharth Latkar

FIH Pro League Hockey News
जंगलातुन चरून आल्यानंतर वरंधातील एकाच शेतक-याच्या १० म्हशींचा झाला मृत्यू
FIH Pro League Hockey News
Solapur: भीषण अपघातात चार भाविकांचा मृत्यू, १९ जखमी; कदमवाडीवर शाेककळा

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com