मँचेस्टर : फुटबाॅलप्रेमींत (sports) कमालीचा लाेकप्रिय असेलल्या क्रिस्टियानो रोनाल्डोने (Cristiano Ronaldo) ऑस्ट्रो-चेक जोसेफ बिकन (Josef Bican) (८०५) यांचे रेकाॅर्ड माेडीत काढत व्यावसायिक फुटबॉलमध्ये (football) सर्वकालीन आघाडीचा स्कोअरर म्हणून स्वत:चे नाव कोरले. शनिवारी प्रीमियर लीगमध्ये टॉटनहॅम (Tottenham) विरुद्ध मँचेस्टर युनायटेडकडून (Manchester United) सलामीवीर गोल करणाऱ्या रोनाल्डोने १२ व्या मिनिटाला नेट शोधून कारकिर्दीतील ८०५ वा गोल नोंदवला.
रोनाल्डोचा शानदार स्ट्राइक हा त्याच्या संघातील फ्रेडने त्याला दिलेल्या चेंडूवर लांब गाेल पोस्टच्या वरच्या कोपऱ्यात मारल्यानंतर यशस्वी झाला. यावेळी राेनाल्डाेची सर्वाधिक गोल करण्या-या बिकानशी बरोबरी झाली.
रोनाल्डोने ३८ व्या मिनिटाला जाडोन सांचोने दिलेल्या पासमधून स्वतःचा ८०६ वा गोल नोंदवला आणि सर्वकालीन गोल करणार्या यादीत प्रथम स्थानाचा मान मिळविला. दरम्यान रेड डेव्हिल्सने आघाडी गमावली जेव्हा स्पर्सने दोन गोल करत २-२ अशी बरोबरी साधली.
८१ व्या मिनिटाला रोनाल्डोने एका कॉर्नरमधून गोल करून संस्मरणीय हॅट्ट्रिक पूर्ण केल्यावर युनायटेडने आघाडी घेतली. रोनाल्डोच्या कारकिर्दीतील ही ५९ वी हॅटट्रिक होती आणि २००८ नंतर ओल्ड ट्रॅफोर्ड संघासाठी त्याची पुनरागमनानंतरची पहिली हॅटट्रिक आहे.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.