सातारा : राज्य सरकार, केंद्र सरकारने माेठ्या शहरांमध्ये सायकल ट्रॅक करावेत. जेणेकरुन अनेकांना त्याचा फायदा हाेईल. मुंबई शहरात सायकलिंग ट्रॅक झाल्यास प्रदुषण कमी हाेण्यास मदत हाेईल तसेच नागरिकांचा आराेग्य ठणठणीत राहील असे मत अभिनेते आमिर खान यांनी व्यक्त केले. (satara latest marathi news)
ग्लाेबल वाॅर्मिंग- ग्लाेबल वाॅर्निंग (global warming) या सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक (satara dcc bank) आणि लायन्स क्लब यांच्यावतीने आयाेजिलेल्या परिषदेत विविध तज्ञांनी मते मांडली. अभिनेते अमीर खान (aamir khan) यांनी या उपक्रमाचे काैतुक करुन पर्यावरण जपण्याचे काम आपल्या सर्वांचे आहे असे मत व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे उदघाटन (satara) राज्याचे पर्यावरण, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे (aaditya thackeray) यांच्या हस्ते झाले. त्यावेळी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर (ramraje naik nimbalkar), जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष नितीन पाटील (nitin patil) यांच्यासह संचालक मंडळ व पर्यावरणप्रेमी उपस्थित आहेत.
परदेशात गेल्यावर आपल्याला सायकल ट्रॅक (cycle track) पहावयास मिळते. आपल्या देशात देखील अनेक राज्य, शहर आहेत. जेथे सायकल ट्रक आहेत. मुंबई शहर (mumbai city) हे सायकलींगचे शहर म्हणून परिचित झाले पाहिजे अशी भावना अमीरने व्यक्त केली. अमीर म्हणाला मुंबईत सायकल चालविण्यासाठी ट्रॅक नाहीत. त्यामुळे सायकलींग करताना अनेक अडचणींना सामाेरे जावे लागते. सायकल ट्रॅक झाल्यास मुंबई शहरातील प्रदुषण थाेडे फार कमी हाेईल. छाेट्या छाेट्या गाेष्टीतून माेठ्या गाेष्टी घडतात असेही आमिर खानने नमूद केले..
राज्य सरकार, केंद्र सरकारने माेठ्या शहरांमध्ये सायकल ट्रॅक करावेत. जेणेकरुन अनेकांना त्याचा फायदा हाेईल. शेतक-यांसाठी आयाेजिलेल्या या कार्यक्रमामुळे निश्चित राज्यातील शेतक-यांना पुढं नेमके कसे काम करायचे आहे हे स्पष्ट हाेईल. अभिनेते सयाजी शिंदे यांचे देखील पर्यावरण दृष्टीने माेठं कार्य असल्याचे आमिरने नमूद केले.
Edited By : Siddharth Latkar
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.