bengal warriorz saam tv
Sports

PKL 2024: बंगाल वॉरियर्सचा कॅप्टन ठरला! मनिंदर सिंग नव्हे, तर या खेळाडूकडे नेतृत्वाची धुरा

Fazel Atrachali to Captain Bengal Warriorz in Season 11: बंगाल वॉरियर्स संघाने आगामी हंगामासाठी नव्या कर्णधाराची घोषणा केली आहे.

Ankush Dhavre

आगामी प्रो कबड्डी लीग २०२४ स्पर्धेला येत्या १८ ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेसाठी सर्व संघांनी कसून सराव करायला सुरुवात केली आहे. दरम्यान बंगाल वॉरियर्स संघाने आपल्या नव्या कर्णधाराची घोषणा केली आहे. आगामी हंगामात फझल अत्राचली संघाचं नेतृत्व करताना दिसून येणार आहे तर मितेश कुमारची उपकर्णधारपदी निवड करण्यात आली आहे.

बंगाल वॉरियर्स संघात एकापेक्षा एक स्टार खेळाडूंची भरमार आहे. या हंगामात मनिंदर सिंग देखील संघाचा भाग असणार आहे. मनिंदर सिंगला संघाचं कर्णधारपद मिळू शकते, अशी चर्चा सुरु होती. मात्र टीम मॅनेजमेंटने ही जबाबदारी फझल अत्राचलीकडे सोपवली आहे. या हंगामासाठी बंगालने अनुभवी आणि युवा खेळाडूंना आपल्या संघात स्थान दिलं आहे. त्यामुळे कर्णधार फझल अत्राचली व मनिंदर सिंग ही जोडी यंदाच्या मोसमात संस्मरणीय कामगिरी करेल अशी अपेक्षा आहे.

प्रो कबड्डी लीग मधील सर्वाधिक लोकप्रिय खेळाडूंपैकी एक असलेला फझल दुसऱ्या मोसमापासून स्पर्धेत असून बंगालकडून पहिल्यांदाच खेळण्यासाठी तो सज्ज झाला आहे. ३५ वर्षीय फझल आतापर्यंत १६९ सामने खेळला असून त्यातून तब्बल ४९४ गुणांची कमाई केली आहे. सुलतान या टोपण नावाने प्रसिद्ध असलेल्या फाझलने चढाईत ९० टक्के नाबाद राहण्याची आणि पकडीत ५४ टक्के यशाची ग्वाही दिली आहे. एकापेक्षा अधिक वेळी सर्वोत्तम बचावपटू खिताब त्याने पटकावला.

तसेच आशियाई स्पर्धेतील दोनदा रौप्यपदक(२०१०-२०१४) आशियाई सुवर्णपदक (२०१८) याबरोबरच प्रो कबड्डी लीग स्पर्धा दोनदा जिंकण्याची व गुजरात जायंटस पदार्पणाच्या वर्षात अंतिम फेरीत नेन्याची कामगिरी त्याने केली आहे.

मितेश कुमार हा या संघाचा अनुभवी खेळाडू असून २०१७ पासून स्पर्धेत सहभागी आहे. फझल अत्राचलीच्या साथीत सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी तो सज्ज झाला आहे. प्रो कबड्डी लीग मध्ये १२९ सामन्यातून त्याने ३५४ गुण मिळवले.

तसेच, चढाईपटू ५८.३३ टक्के नाबाद राहण्याची व पकडीत ५० टक्के यशाची कामगिरी त्याने बजावली आहे. फझलप्रमाणे तो बंगाल संघात पहिल्यांदाच खेळणार आहे. सहाव्या मोसमात 100गुणांची कामगिरी करून संस्मरणीय पुरस्कार मिळवणारा मितेश कुमार यंदाच्या मोसमातही आपला ठसा उमटवेल असा सर्वांना विश्वास आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dahihandi 2025 : दहीहंडीमध्ये २ गोविंदाचा मृत्यू; ९५ जण जखमी, कोणत्या हॉस्पिटलमध्ये किती जण अॅडमिट, जाणून घ्या

Mumbai Lake Water Level : मुंबईकरांसाठी खूशखबर! तुळशी तलाव ओव्हरफ्लो, ७ तलावात किती पाणीपुरवठा?

Konkan Railway: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; रेल्वेनं घेतला मोठा निर्णय

Ajit Pawar Rohit Pawar : अजित पवार विरूद्ध रोहित पवार, दादांचा पुतण्याला दम

Mumbai Dahi Handi 2025 : मुंबईत दहीहंडी उत्सवाला गालबोट; आणखी एका गोविंदाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT