namibia saam tv
Sports

आता काय खरं नाय! Faf Du Plessis नामिबियाकडून खेळणार; मिळाली कॅप्टन्सीची ऑफर

Faf Du Plessis Play For Namibia: येत्या २८ मार्चपासून आयसीसी अंडर १९ वर्ल्डकप २०२६ स्पर्धेतील पात्रता फेरीतील सामन्यांना सुरुवात होणार आहे.

Ankush Dhavre

दक्षिण आफ्रिकेचा स्टार फलंदाज फाफ डू प्लेसिसने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम केला आहे. गेल्या हंगामात तो रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाचं नेतृत्व करताना दिसून आला होता. या हंगामात तो दिल्लीकडून खेळताना दिसून येणार आहे.

त्याच्याकडे या संघाच्या उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. दरम्यान आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आणखी एका फाफ डू प्लेसिसची एन्ट्री झाली आहे.

आयसीसी अंडर १९ वर्ल्डकप २०२६ स्पर्धेतील पात्रता फेरीतील सामन्यांसाठी नामिबिया संघ सज्ज झाला आहे. या संघाची जबाबदारी फाफ डू प्लेसिसकडे सोपवण्यात आली आहे. आता तुम्हाला प्रश्न पडलाच असेल की, ४० वर्षांचा फाफ डू प्लेसिस अंडर १९ संघाचं नेतृत्व कसा करु शकतो? तर उत्तर सोपं आहे.

नामिबियामध्ये राहणाऱ्या खेळाडूचं नाव देखील फाफ डू प्लेसिस आहे. त्याच्याकडे या संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. हा युवा खेळाडू अवघ्या १७ वर्षांचा आहे.

पात्रता फेरीतील सामन्यांना केव्हा होणार सुरुवात?

फाफ डू प्लेसिसला वयाच्या १७ व्या वर्षी नामिबिया संघाचं नेतृत्व करण्याची संधी मिळाली आहे. espncricinfo ने दिलेल्या माहितीनुसार, हा खेळाडू अष्टपैलू खेळाडू आहे. तो उजव्या हाताचा फलंदाज असून लेग स्पिन गोलंदाजी करतो. डिव्हिजन १ पात्रता फेरीतील सामन्यांना येत्या २८ मार्चपासून सुरुवात होणार आहे. नामिबियाचा ज्या संघात समावेश करण्यात आला आहे, त्या संघात केनिया, नाइजेरिया, सिएरा लियोन, तंजानिया आणि युगांडा या संघाचा समावेश आहे.

या स्पर्धेतील सामने नाइजेरियातील लागोसमध्ये खेळवले जाणार आहेत. या स्पर्धेत नामिबियाचा पहिला सामना २८ मार्चला खेळवला जाणार आहे. या सामन्यात नामिबिया आणि नाइजेरिया हे दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. २०२६ मध्ये होणारा अंडर १९ वर्ल्डकप झिम्बाब्वे आणि नामिबियात खेळवला जाणार आहे. जर नामिबियाने आफ्रिका गटातून विजय मिळवला, तर हा संघ या स्पर्धेत प्रवेश करेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shantanu Naidu Girlfriend : रतन टाटांचा विश्वासू शांतनु नायडूकडून प्रेमाची कबुली; फोटोतील तरुणी आहे तरी कोण?

Maharashtra Live News Update:आयुष कोमकर खूनप्रकरणी २ जणांना अटक तर १३ जणांवर गुन्हा

Pune Metro : पुणे मेट्रो सुसाट! २४ तासांत तब्बल ६ लाख जणांचा प्रवास, गणेशोत्सवात मेट्रोची कोट्यवधींची कमाई

Coconut Chikki Recipe :घरीच १० मिनिटांत बनवा खोबऱ्याची चिक्की, मिळेल मार्केटसारखी चव

Ankita Walawalkar : सलमान खानच्या 'Bigg Boss 19' मध्ये अंकिता वालावलकरची वाइल्ड कार्ड एन्ट्री? पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT