ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आयपीएलच्या १७ वर्षांच्या इतिहासात सर्वात जलद शतक ठोकण्याचा विक्रम युनिव्हर्स बॉस ख्रिस गेलच्या नावावर आहे. त्याने २०१३ मध्ये युसूफ पठाणचा विक्रम मोडला.
सर्वात जलद शतक ठोकणाऱ्या टॉप-५ खेळाडूंच्या यादीत स्थान मिळवणाऱ्या खेळाडूंमध्ये ४ परदेशी आणि एका भारतीय फलंदाजाचा समावेश आहे.
या यादीत क्रिस गेल अव्वल स्थानावर आहे. पुणे वॉरियर्सविरुद्धच्या सामन्यात गेलने ३० चेंडूत शतक झळकावले. त्याच सामन्यात त्याने १७५ धावांची नाबाद खेळीही केली.
या यादीत भारतीय खेळाडूचे नाव दुसऱ्या स्थानावर आहे. २०१० मध्ये मुंबईविरुद्धच्या सामन्यात युसूफ पठाणने ३७ चेंडूत शतक झळकावले होते.
डेव्हिड मिलरने २०१३ मध्ये आरसीबीविरुद्ध ३८ चेंडूत शतक झळकावले होते. या यादीत डेव्हिड मिलर तिसऱ्या क्रमांकावर आहे.
ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज ट्रॅव्हिस हेड या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. गेल्या हंगामात त्याने आरसीबीविरुद्ध ३९ चेंडूत शतक झळकावले होते.
या यादीत विल जॅक्स पाचव्या क्रमांकावर आहे. २०२४ मध्ये त्याने गुजरात टायटन्सविरुद्ध ४१ चेंडूत शतक झळकावले.