ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
उन्हाळा आला की आजारी पडण्यासह त्वचेशी संबंधित समस्या सुरू होतात. जेव्हा बाहेरचे तापमान आधीच जास्त असते तेव्हा शरीराचे तापमान आणखी वाढते.
शरीराचे तापमान वाढल्याने पचनक्रियेवर परिणाम होतो. याशिवाय, शरीराची तापमान नियंत्रित करण्याची क्षमता आणि रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असते.
वाढत्या तापमानात कांजण्या ही सर्वात सामान्य समस्या आहे. यामध्ये शरीरावर पाण्याने भरलेले मुरुम दिसू लागतात.
उन्हाळ्यात टायफॉइडचा धोका देखील असतो. यामध्ये ताप आणि डोकेदुखी बराच काळ राहते.
उन्हाळ्यात डोळ्यांची जळजळ होणे आणि डोळ्यांच्या अॅलर्जीचा धोका वाढतो. यासाठी नेहमी स्वच्छ पाण्याने चेहरा धुवा.
या व्यतिरिक्त, उन्हाळ्यात थकवा येणे सामान्य आहे. तसेच आणि उष्माघाताचा धोका वाढतो.
उन्हाळ्यात शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्या. तसेच फळांचा रस किंवा नारळ पाणी यांचे सेवन करा.