ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
कुठेही लवकर पोहोचण्यासाठी सोप्या रस्त्याने केलेला प्रवास नेहमीच फायदेशीर ठरतो. मात्र हेच सोपे रस्ते कधी जीवघेणे ठरु शकतात.
काही मार्ग खूप भयानक आणि धोकादायक असतात. या रस्त्यांवर गाडी चालवणे खूप धोकादायक असू शकते.
आज आम्ही तुम्हाला अशा रस्त्यांबद्दल सांगणार आहोत, जे खूप भयानक आणि धोकादायक आहेत.
पाकिस्तानातील हा रस्ता डोंगराळ भागाच्या मध्यभागी आहे, येथे कोणतीही सुरक्षा व्यवस्था नाही आणि भूस्खलनाचा धोका आहे.
हा रशियातील बर्फाळ महामार्ग आहे जो अनेक किलोमीटरपर्यंत पसरलेला आहे आणि या महामार्गाचे बहुतेक भाग धोकादायक आहेत.
चीनमधील डोंगराच्या कडेला बांधलेल्या या रस्त्याला अनेक अरुंद रस्ते आहेत.
बोलिविया या देशातील या रस्त्याला डेथ रोड असेही म्हणतात आणि येथील हवामान कधीही बदलू शकते.