Faf du plessis statement on winning ipl 2024 trophy after womens team won wpl amd2000 twitter
Sports

IPL 2024: महिल्या संघाच्या विजयामुळे RCB च्या पुरुष संघावर जेतेपदाचा दबाव? फाफ डू प्लेसिसचं लक्षवेधी विधान

RCB vsPBKS,IPL 2024: आयपीएल २०२४ स्पर्धेतील सहावा सामना सोमवारी (२५ मार्च) पार पडला. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्ज हे दोन्ही संघ आमने सामने आले होते.

Ankush Dhavre

Faf Du Plessis Statement, IPL 2024:

आयपीएल २०२४ स्पर्धेतील सहावा सामना सोमवारी (२५ मार्च) पार पडला. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्ज हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघातील खेळाडूंनी शानदार खेळ करत पंजाबवर ४ गडी राखून विजय मिळवला. दरम्यान या सामन्यापूर्वी फाफ डू प्लेसिसला, महिला संघाने WPL जिंकल्यामुळे तुमच्यावर दबाव आला आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नावर फाफ डू प्लेसिसने काय उत्तर दिलं? जाणून घ्या.

नुकताच पार पडलेल्या वुमेन्स प्रीमियर लीग स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या महिला संघाने दमदार खेळ केला आणि जेतेपदावर नाव कोरलं. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू पुरुषांच्या संघाने ३ वेळेस आयपीएल स्पर्धेची फायनल गाठली आहे. मात्र या संघाला जेतेपदाला गवसणी घालता आलेली नाही.

तुमच्यावर जेतेपदाचा दबाव आहे का? असा प्रश्न फाफ डू प्लेसिसला विचारण्यात आला आहे. या प्रश्नाचं उत्तर देताना तो म्हणाला की, तुम्ही म्हणू शकता की, आरसीबीने ट्रॉफी जिंकली नाहीये. मात्र आता महिला संघाने करून दाखवलं आहे. आम्हाला हे नक्कीच प्रेरणा देणारं आहे. खेळाडू या हंगामासाठी उत्साहित आहेत.' (Cricket news in marathi)

आयपीएल २०२४ स्पर्धेतील पहिला सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि चेन्नई सुपर किंग्ज या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला पराभवाचा सामना करावा लागला. मात्र पंजाब किंग्जविरुद्ध झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने शानदार कमबॅक केलं असून जेतेपदाला गवसणी घातली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: २७ हजार लाडक्या बहिणींचे ₹१५०० कायमचे बंद, लाडकीचा अर्ज का केला बाद?

Nilesh Sable : बॉलिवूड कलाकार अन् मराठी भाषा, CHYD बाबत निलेश साबळे स्पष्ट म्हणाला...

Mumbai: घरातले साखरझोपेत, वाहतूक पोलिसानं टोकाचं पाऊल उचललं; गळफास घेत आयुष्य संपवलं

Maharashtra Live News Update: नाशिक गुजरात महामार्ग अवजड वाहनांसाठी बंद

Mhada Lottery : आमदाराला फक्त ९.५ लाखांत घर, म्हाडाच्या लॉटरीत ९५ राखीव घरे

SCROLL FOR NEXT