वुमेन्स प्रीमियर लीग स्पर्धेतील फायनलमध्ये दिल्ली कॅपिटल्सला सलग दुसऱ्यांदा पराभावाचा सामना करावा लागला आहे. दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर पार पडलेल्या या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि दिल्ली कॅपिटल्स हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाकडून दिल्ली कॅपिटल्सला ८ गडी राखून पराभवाचा सामना करावा लागला आहे.
तर गतवर्षी झालेल्या फायनलमध्ये दिल्ली कॅपिटल्सला मुंबई इंडियन्सकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. दरम्यान सलग दुसऱ्यांदा झालेल्या पराभवानंतर दिल्लीची कर्णधार मेग लेनिंगला अश्रू अनावर झाल्याचे पाहायला मिळाले आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
संपूर्ण स्पर्धेत चांगली कामगिरी करुन अंतिम सामना गमावल्यानंतर दिल्लीच्या खेळाडूंचे डोळे पाणावले. दिल्लीची कर्णधार मेग लेनिंगचा एक व्हिडिओ चर्चेचा विषय ठरतोय,ज्यात तिच्या डोळ्यात अश्रू येत असल्याचं दिसून येत आहे. ती आपले अश्रू पुसताना दिसून येत आहे.
दिल्लीचा संघ शेवटपर्यंत चॅम्पियनसारखा खेळत राहिला. मात्र निर्णायक सामन्यात पराभव पदरी पडल्यानंतर दिल्ली कॅपिटल्सच्या ड्रेसिंग रुममध्ये शांत वातावरण होतं. तर दुसरीकडे आपलं पहिलं जेतेपद पटकावणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाच्या ताफ्यात जल्लोषाचं वातावरण होतं. (Cricket news in marathi)
निर्णायक सामन्यात दिल्लीचा पराभव..
या सामन्यात दिल्लीची कर्णधार मेग लेनिंगने टॉस जिंकला आणि प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. हा निर्णय सार्थ ठरवत शेफाली वर्मा आणि मेग लेनिंगने मिळून ६४ धावांची भागीदारी केली. संघाला चांगली सुरुवात मिळाल्यानंतर असं वाटलं होतं की, दिल्लीचा संघ मोठी धावसंख्या उभारणार. मात्र दिल्लीचा डाव १८.३ षटकात अवघ्या ११३ धावांवर आटोपला. या धावांचा पाठलाग करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने १९.३ षटकात दिलेलं आव्हान पूर्ण करत जेतेपदाला गवसणी घातली.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.