लवकरच आयसीसी ट्रॉफीला सुरुवात होणार आहे. सर्व चाहते या स्पर्धेसाठी फार उत्सुक आहेत. यंदा ही स्पर्धा पाकिस्तानने आयोजित केलेल्या 'हायब्रीड मॉडेल'अंतर्गत खेळवली जाणार आहे. पाकिस्तानच्या तीन शहरांमध्ये जसं की लाहोर, रावळपिंडी, कराची तर काही सामने दुबईत होणार आहेत. १९ फेब्रुवारीला कराचीमध्ये पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील सामन्याने या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. तर टीम इंडियाला आपला पहिला सामना २० फेब्रुवारीला बांगलादेशविरुद्ध दुबईत खेळणार आहे.
ही स्पर्धा सुरु होण्यापूर्वी आयसीसीने चॅम्पियन्स ट्रॉफीच्या बक्षिसाची रक्कम जाहीर केली आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या विजेत्याला 2.24 मिलियन डॉलर म्हणजेच सुमारे 19.46 कोटी रुपये मिळणार आहे. याचसोबत उपविजेत्या संघाला १.१२ दशलक्ष डॉलर म्हणजेच सुमारे ९.७३ कोटी रुपयांचं बक्षीस मिळेल. उपांत्य फेरीत पराभूत होणाऱ्या दोन्ही टीम्सना समान ५,६०,००० डॉलर (सुमारे ४.८६ कोटी रुपये) मिळणार आहेत.
चॅम्पियन्स ट्रॉफीतील प्रत्येक सामना टीमसाठी महत्त्वाचा असणार आहे. ग्रुप स्टेजमधील सामना जिंकल्यास टीमला ३४००० डॉलर (सुमारे २९.५३ लाख रुपये) मिळणार आहे. तर पाचव्या आणि सहाव्या स्थानावरील टीम्सना तितकीच रक्कम ३,५०,००० डॉलर (सुमारे ३.०४ कोटी रुपये) मिळणार आहे.
सातव्या आणि आठव्या क्रमांकाच्या संघाला तेवढेच १४०००० डॉलर (सुमारे १.२२ कोटी रुपये) मिळणार असून या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या संघांना १२५००० डॉलर (सुमारे १.०९ कोटी रुपये) देणार आहेत.
आयसीसीचे अध्यक्ष जय शाह यांनी सांगितलं की, "आयसीसी पुरुष चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ हा क्रिकेटसाठी एक महत्त्वाचा क्षण मानला जातो. या मोठ्या बक्षिसाच्या रकमेतून आयसीसी खेळात गुंतवणूक करण्यासाठी आणि आमच्या स्पर्धांची जागतिक प्रतिष्ठा राखण्यासाठी सतत वचनबद्ध आहे हे अधोरेखित होतं."
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा, वरुण चक्रवर्थी, हर्षित राणा
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.