Valentines Day: पत्नी अंजली नाहीये सचिनचं पहिलं प्रेम; 'व्हॅलेंटाईन डे'च्याच दिवशी दिली होती जुन्या प्रेमाची कबुली

Valentines Day 2025: क्रिकेटमधील जोडप्यांमध्येही एका खास जोडीचं नाव घेतलं जातं. हे नाव म्हणजे सचिन तेंडुलकर आणि अंजलीचं. आजच्या दिवशी आम्ही तुम्हाला या जोडीबद्दल खास गोष्ट सांगणार आहोत.
Sachin tendulkar First Love
Sachin tendulkar First Lovesaam tv
Published On

आज वॅलेटाईन्स डे म्हणजे प्रेमाचा दिवस आहे. आजचा दिवशी अनेक जोडपी साजरी करतात. क्रिकेटमधील जोडप्यांमध्येही एका खास जोडीचं नाव घेतलं जातं. हे नाव म्हणजे सचिन तेंडुलकर आणि अंजलीचं. आजच्या दिवशी आम्ही तुम्हाला या जोडीबद्दल खास गोष्ट सांगणार आहोत. काही वर्षांपूर्वी याच दिवशी सचिनने खुलासा केला होता की, सचिनचं पहिलं प्रेम अंजली तेंडुलकर नाही तर दुसरं कोणीतरी आहे.

14 फेब्रुवारी म्हणजेच व्हॅलेंटाईन डेला सचिन तेंडुलकरने एक पोस्ट शेअर केली होती. ज्यामध्ये तो क्रिकेटची प्रॅक्टिस करताना दिसतोय. सचिनने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये त्याने नेटच्या समोर दोन शॉट्स खेळलेत. ज्यात बॉल आणि बॅटचा संबंध पाहून चाहतेही मास्टर-ब्लास्टरच्या प्रेमात पडले होते. २०२० मध्ये सचिनने हा फोटो पोस्ट केला होता.

Sachin tendulkar First Love
Rajat Patidar Lovestory: लग्नासाठी हॉटेल बुक झाले,बोहल्यावर चढणार तेच ऐनवेळी IPL कडून कॉल आला, लग्न सोडून थेट पोहचला मैदानात

कशी आहे सचिन-अंजलीची लव्ह स्टोरी?

सचिन तेंडुलकर आणि अंजली तेंडुलकर यांची पहिली भेट 1990 मध्ये मुंबई विमानतळावर झाली होती. असं म्हटलं जातं की, अंजली तिच्या आईसोबत होती आणि सचिन आंतरराष्ट्रीय टूरवरून परतत होता. काही काळानंतर मित्राने दिलेल्या पार्टीत भेटल्यानंतर सचिन आणि अंजली एकमेकांना जाणून घेऊ लागले.

Sachin tendulkar First Love
Pakistan Players Fined: शहाणपणा नडला! चॅम्पियन्स ट्रॉफीआधी पाकिस्तानच्या ३ खेळाडूंवर ICC ची मोठी कारवाई

अखेर अडकले लग्नाच्या बेडीत

अनेक वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी 1995 मध्ये लग्न केलं. मे २०२५ मध्ये त्यांच्या लग्नाला ३० वर्षे पूर्ण होणार आहेत. सचिन आणि अंजली यांना दोन मुलं आहे. त्यांच्या मुलांची नावं अर्जुन आणि मुलीचे नाव सारा आहे.

Sachin tendulkar First Love
WPL 2025: आजपासून महिला प्रीमियर लीग स्पर्धेला सुरुवात! केव्हा, कुठे अन् कधी पाहता येणार सामने?

कशी आहे सचिनची क्रिकेटची कारकिर्द

सचिन तेंडुलकरने १६ नोव्हेंबर २०१३ रोजी आपल्या क्रिकेट कारकिर्दीला पूर्णविराम दिला. सचिनने नोव्हेंबर १९८९ मध्ये आपल्या क्रिकेट कारकिर्दीला सुरुवात केली होती. तर नोव्हेंबरमध्येच त्याने क्रिकेटला अलविदा करण्याचा निर्णय घेतला. त्याने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत ३४,३५७ रन्स केले आहेत. शिवाय त्याच्या नावे १०० शतकांचा विक्रम देखील आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com