Pakistan Players Fined: शहाणपणा नडला! चॅम्पियन्स ट्रॉफीआधी पाकिस्तानच्या ३ खेळाडूंवर ICC ची मोठी कारवाई

Pakistan Players Fined By ICC: पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामन्यादरम्यान पाकिस्तानी खेळाडूंनी दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांसोबत वाद घातला होता, आता आयसीसीने कारवाई केली आहे.
Pakistan Players Fined: शहाणपणा नडला! चॅम्पियन्स ट्रॉफीआधी पाकिस्तानच्या ३ खेळाडूंवर ICC ची मोठी कारवाई
pakistantwitter
Published On

न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेचा संघ पाकिस्तान दौऱ्यावर आहे. या तिन्ही संघांमध्ये तिरंगी मालिकेचा थरार सुरु आहे. या स्पर्धेत १२ फेब्रुवारीला झालेल्या सामन्यात पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते.

या सामन्यात पाकिस्तानच्या खेळाडूंनी आयसीसीच्या आचारसंहितेच्या नियमांचं उल्लंघन केलं. दरम्यान आता आयसीसीने पाकिस्तानच्या खेळाडूंवर मोठी कारवाई केली आहे.

Pakistan Players Fined: शहाणपणा नडला! चॅम्पियन्स ट्रॉफीआधी पाकिस्तानच्या ३ खेळाडूंवर ICC ची मोठी कारवाई
Team India: IND vs ENG मालिकेतून टीम इंडियाला काय मिळालं? Champions Trophy आधी किती प्रश्नांची उत्तरं मिळाली?

पाकिस्तानच्या खेळाडूंवर आयसीसीची कारवाई

आयसीसीने पाकिस्तान संघातील ३ खेळाडू शाहीन आफ्रिदी, सऊद शकील आणि कामरान गुलाम यांच्यावर नियमांचं उल्लंघन केल्यामुळे दंड आकारण्यात आला आहे. शाहीन आफ्रिदीवर मॅच फीच्या २५ टक्के दंड आकारण्यात आला आहे.

तर कामरान गुलाम आणि सऊद शकील यांच्यावर मॅच फी च्या १० टक्के दंड आकारण्यात आला आहे. पाकिस्तानचे खेळाडू दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज मॅथ्यू ब्रित्जकीसोबत वाद करताना दिसून आले होते. त्यामुळे आयसीसीने ही कारवाई केली आहे.

नेमकं काय घडलं?

तर झाले असे की, दक्षिण आफ्रिकेची फलंदाजी सुरु असताना पाकिस्तानकडून २८ वे षटक टाकण्यासाठी शाहीन आफ्रिदी गोलंदाजीला आला होता. या षटकात गोलंदाजी करत असताना, मॅथ्यू ब्रित्झकीने मिडविकेटच्या दिशेने शॉट मारला आणि क्षेत्ररक्षकाला बॅट दाखवली. त्यावेळी शाहीन आफ्रिदी फलंदाजाच्या दिशेने धावला आणि त्याला शिवीगाळही केली.

पुढच्याच चेंडूवर ब्रित्झकीने शॉट मारला आणि १ धाव घेण्याचा प्रयत्न केला. धाव घेत असताना, शाहीन आफ्रिदीने त्याला पायात पाय अडकवून खाली पाडण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर दोघांमध्येही बाचाबाची झाली. अंपायर आणि खेळाडूंनी मध्यस्थी करत हा वाद मिटवला.

Pakistan Players Fined: शहाणपणा नडला! चॅम्पियन्स ट्रॉफीआधी पाकिस्तानच्या ३ खेळाडूंवर ICC ची मोठी कारवाई
IND vs ENG: गिलचं शतक, कोहली- अय्यरचं विराट अर्धशतक! भारताने इंग्लंडसमोर ठेवलं भलंमोठं आव्हान

त्यानंतर सौद शकील आणि कामरान गुलाम यांच्यावर देखील आयसीसीने दंड आकारला आहे. टेम्बा बावूमाने या सामन्यात फलंदाजी करताना शानदार अर्धशतकी खेळी केली. मात्र २९ व्या षटकात तो धावबाद होऊन माघारी परतला.

ज्यावेळी तो बाद होऊन माघारी परतला, त्यावेळी हे दोघेही खेळाडू त्याच्या अतिशय जवळ जाऊन आक्रमक होऊन सेलिब्रेशन करताना दिसून आला. हे आयसीसीच्या आचारसंहितेच्या नियमांचं उल्लंघन आहे. त्यामुळे आयसीसीने कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com